ACB Trap News | 5000 रुपये लाच स्वीकारताना हेड कॉन्स्टेबल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यसाठी आणि अटक (Arrest) न करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी करुन 5 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) कन्नड तालुक्यातील देगाव (रंगारी) पोलीस ठाण्यातील (Degaon (Rangari) Police Station) हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुरेश देवराव शिंदे Head Constable Suresh Devrao Shinde (वय-38) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. औरंगाबाद एसीबीने (ACB Trap News) ही कारवाई सोमवारी (दि.31) केली.

याबाबत 35 वर्षीय व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे त्यांच्या मोठ्या भावाशी व भावजयीशी घरगुती वाद झाले आहेत. त्या वादामध्ये तक्रारदार यांच्यावर आयपीसी 323, 324, 506, 427 प्रमाणे देगाव (रंगारी) पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी तसेच वाढीव कलम न लावण्यासाठी हेड कॉन्स्टेबल सुरेश शिंदे यांनी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 5 हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी 28 जुलै रोजी औरंगाबाद एसीबी (Aurangabad ACB) कार्यालयात हेड कॉन्स्टेबल सुरेश शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता शिंदे यांनी 25 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 5 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपये लाच घेताना सुरेश शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर देगाव (रंगारी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर(DySP Rajeev Talekar) यांच्या
मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे (PI Sachin Salunkhe),
पोलीस निरीक्षक हनुमंत वारे (PI Hanumant Vare) पोलीस अंमलदार दिगंबर पाठक, केवलसिंग घुसिंगे,
चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune: Charity fashion show of doctors held successfully in city

Ranveer Singh And Deepika Padukone | ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर थिरकली दीपिका; रणवीरने व्हिडिओ केला शेअर

Kashish Social Foundation | राज्यातील डॉक्टरांचा चॅरिटी फॅशन शो मोठ्या उत्साहात संपन्न

Daisy Shah | अभिनेत्री डेजी शाहने केले अर्चना गौतमवर आरोप; सुनावले खडेबोल

Maharashtra CM Ekanth Shinde sanctioned Rs 8 crore for renovation of Gadkari Rangayatam auditorium in Thane