ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला तलाठ्यासह मदतनीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | शेत जमीन खरेदीची नोंद आणि मिळकतीचे हक्क सोड नोंद करण्यासाठी 50 हजार रुपये लाच मागणाऱ्या महिला तलाठ्यासह लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe) त्यांच्या खासगी मदतनीसाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.11) छत्रपती संभाजीनगर रोडवरील भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर येथे करण्यात आली.

तलाठी निकिता जितेंद्र शिरसाठ Talathi Nikita Jitendra Shirsath (वय-46), खासगी मदतनीस संकेत रणजीत ससाणे Sanket Ranjit Sasane (वय-26 रा. निर्मल नगर, तपोवन रोड, अहमदनगर) असेल लाच स्वीकारताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत नगर तालुक्यातील शेंडी येथील 35 वर्षीय व्यक्तीने अहमदनगर एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांची मौजे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी तलाठी निकीता शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी सोमवारी अहमदनगर एसीबीकडे (Ahmednagar ACB) तक्रार केली.

प्राप्त झालेल्या तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी निकिता शिरसाठ यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांचेकडे जमिनीच्या खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी 50 हजार रुपये लाच मागणी करून ती लाच रक्कम त्यांचे खाजगी मदतनीस संकेत ससाणे यांच्याकडे देण्यास सांगितले.

त्यानुसार एसबीच्या पथकाने सोमवारी छत्रपती संभाजी नगर रोड वरील भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर येथे सापळा लावला.
आरोपी संकेत ससाणे याने तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष 50 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना
रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन (MIDC Police Station) येथे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे
(DySP Pravin Lokhande), पोलीस निरीक्षक राजू आल्हाट (PI Raju Alhat), पोलीस निरीक्षक शरद गोर्डे
(PI Sharad Gorde), पोलीस अंमलदार राधा खेमनर, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, चालक हारून शेख, दशरथ लाड
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर नरेंद्र पाटील यांना विश्वास

Anand Nirgude Resignation | मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांचा राजीनामा; राज्य शासनाने स्वीकारला

Anand Nirgude Resignation | राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याने खळबळ, सरकारने माहिती लपवली, विरोधकांचा आरोप

Devendra Fadnavis | भुजबळांच्या पाठीशी भाजपा आहे का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले – ”मी आमदार व्हायच्या आधीपासून…”

Pune Police MCOCA Action | तरुणाचे अपहरण अन् बेदम मारहाण, तरुणाचा चेहरा विद्रुप करणाऱ्या निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 96 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA