Maratha Reservation | २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर नरेंद्र पाटील यांना विश्वास

नागपूर : मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) महत्वाची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणावर सभागृहाच्या कामकाजात विस्तृत चर्चा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटेल, असे पाटील यांनी म्हटले आहे. ते आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. (Maratha Reservation)

मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र पाटील म्हणाले, मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी वैयक्तिक कारणांनी राजीनामा दिला असावा. सरकार लवकरच नवीन अध्यक्षांची निवड करेल. सरकार आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप नाही. आयोग स्वतंत्र संस्था आहे.

नरेंद्र पाटील म्हणाले, आयोगाने स्वत:चे संशोधन अहवालांच्या आधारावर मत मांडायला हवे. आयोगावर कुणीही दबाव टाकलेला नाही. तसेच आयोगदेखील दबावात काम करत नाही. अध्यक्ष म्हणून काम करण्यास त्यांनी स्वत:ला असमर्थ समजल्यामुळे राजीनामा दिला असावा. (Maratha Reservation)

नरेंद्र पाटील म्हणाले, क्युरेटिव्ह पिटीशन हा सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) विषय आहे.
त्या याचिकेवर मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचा कुठलाही परिणाम होणार नाही.
माझ्या माहितीप्रमाणे, बापट समितीच्या अहवालानुसार, मराठ्यांना आरक्षण मिळावे, असा निर्णय जवळपास झाला होता.

पाटील पुढे म्हणाले, परंतु तत्कालीन राजकारण्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी दबाव टाकला होता.
आता तशी स्थिती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि
अजित पवार (Ajit Pawar) हे लवकरच चर्चा करून मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाची निवड करतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

MP New CM Mohan Yadav | मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, शिवराज सिंह चौहान यांना ‘राजकीय विश्रांती’ दिल्याची चर्चा

Dhananjay Munde | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! किमान किती रूपये पीकविमा मिळणार?; कृषीमंत्र्यांनी दिले उत्तर

Devendra Fadnavis | कांदा निर्यातबंदीबाबत फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, शेतकऱ्यांना दिले ‘हे’ आश्वासन

Pune Pimpri Chinchwad Crime News | घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा, ”राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे न्यायाने पाहत नसतील तर…”