Devendra Fadnavis | भुजबळांच्या पाठीशी भाजपा आहे का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले – ”मी आमदार व्हायच्या आधीपासून…”

मुंबई : Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार खडाजंगी सुरू आहे. दोघेही एकमेकांवर वैयक्तिक आणि आक्षपार्ह टीका करत आहेत. दरम्यान, मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भुजबळ यांच्या पाठीशी भाजपाचा (BJP) अदृश्य हात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली आहे.

देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले की, छगन भुजबळ हे मी आमदार व्हायच्या आधीपासून ओबीसींचा विषय मांडतात. त्यामुळे, त्यांनी काल आणि आज ओबीसींचा विषय हातात घेतला, असे मला वाटत नाही.

भुजबळ भाजपाची स्क्रीप्ट वाचतात का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, कालपर्यंत भुजबळ आमच्यासोबत नव्हते, तेव्हा जे आमच्यासोबत होते ते आमची स्क्रीप्ट वाचत होते. आता, भुजबळ आमच्यासोबत आले आहेत, तर आता ते आमचे स्क्रीप्ट वाचतात. म्हणजे आमचे स्क्रीप्ट फारच पॉप्युलर दिसत आहे. प्रत्येकाला आमचे स्क्रीप्ट आवडायला लागले आहे.

दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात
(Maharashtra Winter Session) सुद्धा चर्चेत येत आहे. मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटील (Narendra Patil)
यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणावर सभागृहाच्या कामकाजात विस्तृत चर्चा
होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा
तिढा सुटेल, असे पाटील यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर नरेंद्र पाटील यांना विश्वास

Anand Nirgude Resignation | मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांचा राजीनामा; राज्य शासनाने स्वीकारला

Anand Nirgude Resignation | राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याने खळबळ, सरकारने माहिती लपवली, विरोधकांचा आरोप