औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र लवकर सादर करण्यासाठी 10 हजार रुपये लाच (Bribe Case) घेताना बिडकीन पोलीस ठाण्यातील (Bidkin Police Station) हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) सापळा रचून रंगेहाथ पकडले. सतीश प्रल्हादराव बोडले Satish Pralhadrao Bodle (वय 54) असे लाच घेतना पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.3) केली. (ACB Trap News)
याबाबत 26 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB) तक्रार केली आहे. तक्रारदार हे पतसंस्थेचे मॅनेजर आहेत. त्यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र लवकर दाखल करून त्यांच्या पतसंस्थेचे पैसे परत मिळवून देण्यासाठी हेड कॉन्स्टेबल सतीश बोडले यांनी 10 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच (ACB Trap News) देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता सतीश बोडले यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची 10 हजार रुपये रक्कम स्वीकारताना
पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश बोडले यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), पोलिस उप अधीक्षक राजीव तळेकर
(DSP Rajeev Talekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस (PI Amol Dhas),
पोलीस अंमलदार भीमराज जीवडे, सुनील पाटील, विनोद आघाव, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा