ACB Trap News | दीड लाखांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – शेतीच्या मालकीचे सेल सर्टिफिकेट (Sale Certificate) पुतण्याच्या नावाने देण्यासाठी मनोरा तहसील कार्यालयातील (Manora Tehsil Office) महसूल सहाय्यक, प्रस्तुतकार (Revenue Assistant) यांना दीड लाख रुपये लाच घेताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. अनंत किसन राठोड Anant Kisan Rathore (वय-34) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महसूल सहाय्यकाचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई बुधवारी (दि.9) तक्रारदार यांच्या साखरडोह येथील घरी केली.

याबाबत मनोरा तालुक्यातील साखरडोह येथील 59 वर्षीय व्यक्तीने वाशिम एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचे मालकीच्या शेतीचे सेल सर्टिफिकेट पुतण्याच्या नावाने देण्याकरिता अनंत राठोड याने दीड लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी वाशिम एसीबीच्या (Washim ACB Trap News) कार्यालयात तक्रार केली होती. पथकाने 1 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता राठोड याने लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

तक्रारदार हे पैसे देण्यास तयार होते. मात्र अनंत राठोड याला शंका आल्याने त्याने पैसे स्वीकारले नाहीत. एसीबीचे पथक हे मागील काही दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेवून होते. आरोपी हा लाचेची रक्कम नेण्यासाठी घरी येत असल्याची माहिती तक्रारदार यांनी पथकाला दिली. बुधवारी कार्यालय बंद झाल्यावर आपल्या गावी जाताना आरोपी राठोड पैसे घेण्यासाठी तक्रारदार यांच्या घरी आले. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. अनंत राठोड याच्यावर मनोरा पोलीस ठाण्यात (Manora Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे (Amravati Zone) पोलीस अधीक्षक मारुती जगताप (SP Maruti Jagtap),
अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware) यांच्या मार्गदर्शनाखाली
वाशिम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके (DySP Gajanan Shelke), पोलीस निरीक्षक सुजित कांबळे
(PI Sujit Kamble) पोलीस अंमलदार विनोद मार्कंडे, नितीन टवलारकार, दुर्गादास जाधव, राहुल व्यवहारे, विनोद अवगळे,
योगेश खोटे, रवींद्र घरत, चालक नावेद शेख यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Pune Municipal Corporation (PMC) | फुरसुंगी, उरूळी देवाची गावं वगळण्यासंदर्भात आज निर्णय, शिंदे सरकारवर निर्णय मागे घेण्याची नामुष्की?