ACB Trap News | 25 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | नवीन मिटर बसवण्यासाठी 25 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) जळगाव महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ Mahavitaran Senior Technician (वायरमन – Wireman) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau ) सापळा रचून रंगेहाथ पकडले. संतोष भागवत प्रजापती Santosh Bhagwat Prajapati (वय 32 रा. जळगाव) असे लाचखोर वायरमनचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई बुधवारी (दि.18) केली.

याबाबत 59 वर्षाच्या व्यक्तीने जळगाव एसीबीकडे (Jalgaon ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या घराचे विज मिटर त्यांच्या आईच्या नावावर आहे. विज मिटर जुने झाले असून ते नादुरुस्त झाल्याने तुम्हाला नवीन मिटर बसवावे लागेल असे संतोष प्रजापती यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी 25 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत जळगाव एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने बुधवारी पडताळणी केली असता संतोष प्रजापती यांनी 25 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना वायरमन संतोष प्रजापती याला रंगेहाथ पकडले. त्याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात (Ramanandnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy), वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख
(DySP Suhas Deshmukh), पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव (PI N.N. Jadhav), पोलीस निरीक्षक अमोल वालसाडे
(PI Amol Valsade), सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस अंमलदार बाळू मराठे,
रविंद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाणे, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ललित पाटीलच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान, म्हणाले-‘आता अनेकांची तोंडं…’ (व्हिडिओ)

Drug Mafia Lalit Patil | पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका, ललित पाटीलचा कोर्टात दावा; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी