
ACB Trap News | लाच घेताना महिला व्यवसाय कर अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | कंपनीचा प्रोफेशन टॅक्स क्रमांक बंद करण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपये लाच घेताना नाशिक येथील व्यवसाय कर अधिकारी कार्यालयातील व्यवसाय कर अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. स्नेहल सुनिल ठाकुर (Snehal Sunil Thakur) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीने ही कारवाई बुधवारी (दि.20) व्यवसाय कर अधिकारी कार्य़ालय, द्वारका येथे केली. (ACB Trap News)
तक्रारदार यांची सेक्युरीटी सर्व्हिसेस एजन्सी चा प्रोफेशन टॅक्स क्रमांक बंद करण्यासाठी व्यवसाय कर अधिकारी स्नेहल ठाकुर यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती चार हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी याबाबत नाशिक एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कार्यालयात सापळा रचला. ठाकुर यांना पंचासमक्ष चार हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. स्नेहल ठाकुर यांच्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap News)
ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी
यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update