ACB Trap On Police Inspector | आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाकडून 50 लाख रुपये लाचेची मागणी, 15 लाख रुपये स्वीकारताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; पोलीस निरीक्षक फरार

FIR On Police Inspector | 2 crore illegal wealth of police inspector in one year; The exploits of the police inspector of Indapur

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व अटक न करण्यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने 50 लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी 15 लाख रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) भाईंदर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau Thane) विभागाने रंगेहाथ पकडले. तर पोलीस निरीक्षक पसार झाले आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.17) करण्यात आली. एसीबीच्या (ACB Trap News) या कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (ACB Trap On Police Inspector)

आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार (PI Mahendra Shelar) असे फरार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर पोलीस हवालदार गणेश वणवे असे 15 लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार व त्यांचे अशिल यांना गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तसेच अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 35 लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

ठाणे एसीबीच्या पथकाने बुधवारी पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 लाख रुपये मागणी करुन तडजोडी अंती 35 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ठरलेल्या रक्कमेपैकी 15 लाखांचा पहिला हप्ता पोलीस हवालदार गणेश वणवे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 15 लाख रुपये स्वीकारताना गणेश वणवे याला रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, एसीबीने कारवाई केल्याचे समजताच पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार फरार झाले आहेत.

एसीबीच्या पथकाने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार व पोलीस हवालदार गणेश वणवे यांच्यावर मिरा रोड पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून गणेश वणवे याला अटक केली आहे. तर फरार पोलीस अधिकाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक अश्विनी संतोष पाटील सहायक पोलीस फौजदार/चव्हाण, पोलीस हवालदार पाटील, महाडिक, महिला पोलीस हवालदार शिंदे,पोलीस शिपाई भुजबळ, चालक सहायक पोलीस फौजदार बर्गे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मातोश्रीवर दहशतवादी हल्ल्याच्या फोनमधील खरे कारण आले समोर; २ महिन्यात २० फेक कॉल

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर