Matoshree Threat Call | मातोश्रीवर दहशतवादी हल्ल्याच्या फोनमधील खरे कारण आले समोर; २ महिन्यात २० फेक कॉल

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर (Matoshree Threat Call) काही लोक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाली होती. पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात फोनवरुन ही माहिती देण्यात आली होती. यामागील नेमके कारण शोधण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. प्रेयसीने नकार दिल्याने नैराश्येतून त्याने हा फोन करुन कथा रचून सांगितल्याचे समोर आले आहे.

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणार्‍या व्यक्तीने सांगितले की मातोश्रीवर हल्ला करण्याबाबत उर्दूमध्ये ४ ते ५ लोक बोलत असल्याचे त्याने स्वत: ऐकले. शयितांचे संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावा त्याने केला. मुंबईहून गुजरातला जाणार्‍या ट्रेनमध्ये ४ ते ५ जण प्रवास करत होते. आणि मातोश्रीवर हल्ला करणार असल्याचे त्याने सांगितले. ते मुंबईतील भायखळा परिसरातील मोहम्मद अली रोडवर भाड्याने खोली घेणार असल्याचे बोलत होते, असे या फोन करणार्‍याने सांगितले होते. रविवारी सायंकाळी हा फोन आला होता.

या फोननंतर मुंबई पोलिसांनी मातोश्री बाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढविली. संपूर्ण मुंबई शहरामध्ये तपासणी सुरु केली होती.

फोन करणार्‍याने फोन केल्यानंतर तो बंद करुन ठेवला होता. पोलिसांनी फोन करणार्‍याचा शोध घेतला असता त्याला त्याच दिवशी प्रेयसीने नकार दिल्याची माहिती समोर आली. प्रेयसीने नकार दिल्याने नैराश्यातून त्याने हा अशा प्रकारे फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या २ महिन्यात मुंबई पोलिसांनी अशा प्रकारे आतापर्यंत २० फेक कॉल आले आहेत. स्वत:च्या नैराश्येतून लोक अकारण संपूर्ण पोलीस यंत्रणेला वेठीस धरत असल्याचे दिसून आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

केमिकल कंपनीतील स्फोटाने बदलापूर हादरले; एका कामगाराचा मृत्यु, चार कामगार जखमी