ACB Trap On PSI Yogesh Dhikale | 1 लाखाची लाच घेताना फौजदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On PSI Yogesh Dhikale | दोषारोपपत्र (Charge Sheet) लवकर पाठवण्यासाठी एक लाखाची लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) मेहुणबारे पोलीस ठाण्यातील (Mehunbare Police Station) फौजदारास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon) रंगेहाथ पकडण्यात आले. योगेश जगन्नाथ ढिकले Yogesh Jagannath Dhikale (वय-32 रा. मेहुणबारे, ता. चाळीसगाव) असे लाचखोर फौजदाराचे नाव आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon) ही कारवाई गुरुवारी (दि. 2) दुपारी दोनच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. (ACB Trap On PSI Yogesh Dhikale)

 

तक्रारदाराविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात 29 मार्च 2022 रोजी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. याबाबत दोषारोपपत्र लवकर पाठवून मदत करायची आणि पोलीस ठाण्यात दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबदल्यात साडेचार लाखांची लाचेची मागणी करण्यात आली होती. यात एक लाखाच्या रक्कमेवर तडजोड झाली. ही रक्कम ढिकले याने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारात घेतली. त्यावेळी सापळा रचलेल्या जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घालून ढिकले याला पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस. पाटील (Deputy Superintendent of Police Shashikant S. Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav), एन.एन. जाधव (Police Inspector N.N. Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक दिनेशसिंग पाटील (API Dinesh Singh Patil), सुरेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनिल पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली.

Web Title :- ACB Trap On PSI Yogesh Dhikale | ACB Trap On PSI Yogesh Dhikale While Taking Bribe Of 1 lakh Jalgaon


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | पत्रातून ‘राज’गर्जना ! ‘मशिदीवरील भोंग्याचा विषय आता कायमचा संपवायचा’

Pune Crime | घरात गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक

Police Suspended | अश्लील व्हिडीओ कॉल करुन खंडणी मागणारा पोलीस कर्मचारी निलंबीत

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ! CBI ने दाखल केले आरोपपत्र

LIC Tech Term Plan | केवळ ऑनलाईन प्रक्रियेंतर्गत मिळतो LIC चा Tech-Term प्लान, जाणून घ्या काय आहेत फीचर आणि लाभ ?