धुळे : वडजई चौफुली जवळ ट्रकच्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरा जवळील मुंबई आग्रा महामार्गावरील वडजई रोडवर मोटर सायकल स्वाराला पाठिमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली.त्यात मोटरसायकल स्वार रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाला आहे.

सविस्तर माहिती की, खेतीया येथे राहणारे कोडाजी गर्दे हे कामकाज निमित्त धुळ्यात आले होते. कामकाज ओटोपून दुपारी मुंबई आग्रा महामार्गाहून वडजई रोड फाट्याने गावाकडे परत जाते वेळी महामार्गाहून पाठिमागून भरधाव वेगाव येणाऱ्या आयशर ट्रक क्रं. एम.पी.09 एच जी.3072 हि ने मोटरसायकल क्रं. एम एच 18 / ए.डी.297 हिला जोरदार धडक दिली. त्यात कोंडाजी गर्दे रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाले. अपघात झाल्या नंतर ट्रक चालक घटनास्थळाहून पसार झाला. महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहने ताब्यात घेतली. महामार्गावरील वाहतूक पुर्ववत केली.

आरोग्यविषयक वृत्त