ACP Narayan Shirgaonkar | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ACP नारायण शिरगावकर यांना पदक; DG रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACP Narayan Shirgaonkar | पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीस परभणीच्या गंगाखेड जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांचा केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान करण्यात आला. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गावात घडली होती. या गुन्ह्याचा तपास नारायण शिरगावकर यांनी केला होता.

 

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गावातील ५ वर्षांच्या निर्भयावर अतिशय क्रूरपणे नराधमाने बलात्कार करून तिचा खून करून विहिरीत टाकून दिले होते. नुकतीच घडलेली कोपर्डी घटना व या घटनेची सवेंदनशीलता, जनतेचा आक्रोश यामुळे या गुन्ह्याचा तपास गंगाखेड या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेले नारायण शिरगावकर यांच्याकडे देण्यात आला. या गुन्ह्यात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी जोडून शिरगावकर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तीन वर्षांच्या कालावधीमध्ये न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आणि पीडितेला न्याय मिळाला.

केंद्रीय गृहमंत्रालयाने या गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल बुधवारी (दि.15) नारायण शिरगावकर यांचा पोलिस महासचालक यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नारायण शिरगावकर यांनी पदक प्रदान करुन माझ्यावर विश्वास दाखवला,
त्यातून आज पर्यंत पोलीस दलात केलेल्या कामाबद्दलचे समाधान मिळाले.
हे यश वरिष्ठांचे मार्गदर्शन व टीमच्या सहकाऱ्याशिवाय शक्य नव्हते,
त्यामुळे त्यांचा आभारी असल्याचे नारायण शिरगावकर यांनी सांगितले.

 

Web Title :- ACP Narayan Shirgaonkar | Medal to ACP Narayan Shirgaonkar from Union Home Ministry for outstanding crime investigation; Honored with a medal by DG Rajnish Seth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणारा विधी सल्लागारासह दोघांना अटक; अशा प्रकारची पहिलीच कारवाई

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा व चिंचवडमध्ये मनसेचा भाजपला पाठिंबा, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं?

Keshav Upadhye | ताई, महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? भाजपचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल