अवैध दारू विरोधात धडक कारवाई ! कच्चा माल विकणाऱ्या शिरुर मधील प्रसिद्ध व्यापाऱ्यासह 5 जणांना अटक

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन  – शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी, फाकटे, मुंजाळवाडी, कवठे येमाई परिसरात अवैध गावठी दारू बनवणारे दारू भट्ट्यावर व देशी-विदेशी दारू विकणारे यांच्यावर, शिरूर पोलिसांनी धडक कारवाई करत, ४ लाख ८८ हजार ५३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर शिरूर पोलिसांनी सखोल तपास करत हातभट्टीस लागणारा कच्चा माल पुरवणारा शिरूर येथील प्रसिद्ध व्यापारी विनय वंसतलाल संघवी यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.

या कारवाईतमध्ये प्रसिद्ध व्यापाऱ्यांसह, संदीप भानुदास घोडे (रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे),अर्जुन सदाशिव हिल्लाळ,सागर गुडगुल,शुभम पांडुरंग मुंजाळ (सर्व रा. कवठे येमाई, ता. शिरुर, जि. पुणे),उमेश चंदु गायकवाड ( रा. फाकटे, ता. शिरूर) या पाच जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

याबाबत आधिक माहिती अशी की टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे हददीमध्ये अवैध्यरित्या देशी व विदेशी दारू, तसेच गावठी हातभटटी दारूची विक्री चालु आहे. अशी बातमी मिळाल्याने तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनकडील सपोनि संदीप कांबळे, पोसई विक्रम जाधव, पोसई स्नेहल चरापले, सहा. फौजदार नजिम पठाण, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार आण्णासाहेब कोळेकर, पोलीस अंमलदार करणसिंग जारवाल, पोलीस अंमलदार विशाल पालवे, पोलीस अंमलदार सुरेश नागलोत यांच्या पथकाने करावाई करत. टाकळी हाजी, फाकटे, मुंजाळवाडी व कवठे यमाई अशा विविध ठिकाणी छापा टाकत त्यात एकुण ५० लिटर गावठी हातभटटीची तयार दारू, ४३ प्लॅस्टिकचे बॅरल प्रत्येकी २०० लि. मापाचे व त्यामध्ये एकुण ८६०० लि. गावठी हातभटटी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, दोन लोखंडी बॅरल व इतर साहीत्य नष्ट केले तसेच देशी विदेशी दारूचा एकुण ११५ बाटल्या, मुददेमाल जप्त करण्यात आला.
तर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन पोलीसांनी जागेवरच उद्धवस्त केले.

यात वरील दोषी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कलम ६५ क,फ या कायदयान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेला असुन, सदरील आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना चार दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली होती.

त्यानंतर पोलिसांनी हातभट्टी बनविणाऱ्या आरोपींची कसुन चौकशी केली असता हातभट्टी बनविण्यास लागणारा कच्चा माल हा शिरूर येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याकडून आणला असल्याचे आरोपींनी तपासात कबुली दिली.आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे सपोनि बिरुदेव काबुगडे यांनी सदरील व्यापाऱ्याकडे एक डमी ग्राहक पाठविला व त्या ग्राहकाने हातभट्टी साठी लागणारे नवसागर द्या अशी मागणी केली असता त्या व्यापाऱ्याने लगेचच तो माल देताच विनय वसंतलाल संगवी या व्यापाऱ्यास रंगेहाथ पकडून अटक करुन त्याच्या कुडून एक बॉक्स जप्त करण्यात आला. व्यापाऱ्यास वरील गुन्ह्यात सहआरोपी करण्यात करत विनय वसंतलाल संगवी यांना जामीन झाल्याचे समजते आहे.

विनय संगवी हा व्यापारी अनेक वर्षापासुन नवसागरची विक्री करत असल्याचे समजते आहे. वास्तविक पाहता नवसागर हे शेतकरी,किंवा औषधे बनविणाऱ्यास विकणे आवश्यक होते मात्र तो हातभट्टी बनविण्यास विक्री करत असल्याचे उघड झाल्याने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप कांबळे, सपोनि बिरूदेव काबुगडे, सहा. फौज. नजिम पठाण, पोलीस नाईक सांगळे हे करीत आहेत.