ग्रामसेवक सैराट अधिकारी झिंगाट

राजगुरूनगर- खेड  : पाेलीसनामा ऑनलाईन

तालुक्यातील पुर्व भागातील वाकळवाडी येथील ग्रामसेवक १ आँक्टोबर रोजी ग्रामपंचायत बंद व ग्रामसेवक कार्यालयात अनुपस्थित असल्याचे बाबाजी पवळे यांना आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6111744c-c596-11e8-83d5-f3998672c366′]

वाकळवाडी येथील ग्रामसेवक गैरहजर असल्याने\पवळे यांनी गटविकास अधिकारी इ़ंदिरा अस्वार यांच्या चौकशी केली असता वाकळवाडी येथील ग्रामसेवक रजेचा अर्ज न देता गैरहजर राहिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान वाकळवाडी येथील ग्रामसेवक आपल्या सोयी नुसार दुपार नंतर कि़ंवा दोन/दोन दिवस कार्यालयात येत नसल्याचे  तसेच मला पुण्यावरून यायला ट्राँफिक लागते म्हणून कधी कधी ग्रामपंचायतला यायला उशीर होतो असे स्थानिक ग्रामस्थांना सांगत आहेत.सदर ग्रामसेवकांवर पंचायत समितीच्या झिंगाट अधिका-यांचा अंकुश राहिला नसल्याने ग्रामसेवक आपल्या मर्जीनुसार काम करत असल्याचे आढळून येत आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’677b73d3-c596-11e8-b188-d9310b3b7aa9′]

वाकळवाडी येथील ग्रामसेवकांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांनी खेड पंचायत समितीचे गटविकास इंदिरा अस्वार मँडम यांच्यांकडे लेखी तक्रार केली आहे गटविकास अधिकारी सदर ग्रामसेवकांवर कारवाई करतात का नाही याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात