Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता अजय देवगन (Actor Ajay Devgn) हा बॉलीवुडचा सुप्रसिद्ध व श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. दरवर्षी अभिनेता अजय देवगनचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतात. याव्यतरिक्त तो निर्मिती क्षेत्रातही कार्यरत असून आता त्याने ओटीटी सिनेमांची देखील निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता अजय देवगनने (Actor Ajay Devgn) नुकतीच मुंबईच्या प्राईम लोकेशनला प्रॉपर्टी खरेदी केली असून याची किंमत करोडो रुपये आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार अभिनेता अजय देवगनने मुंबईच्या अंधेरी वेस्ट परिसरात कमर्शियल जागेमध्ये गुंतवणूक केली आहे. (Ajay Devgn Property) अजयने ही 45 कोटी रुपयांची जागा घेतली आहे. अजयने दोन वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये पाच ऑफिसची जागा खरेदी केली आहे. यामध्ये ऑफिस युनिट आहे. अजयची ही प्रॉपर्टी करोडो रुपयांची असून त्याची स्वत: ची कंपनी देखील आहे. अभिनेता अजय देवगनची एफफिल्म्स (एडीएफ) ही 2000 साली स्थापन करण्यात आलेली निर्मिती व वितरण कंपनी आहे. ही नवीन मालमत्ता सिग्नेचर बिल्डिंगमधील वीरा देसाई रोडवार, ओशिवराचे एकूण क्षेत्रफळ १३.२९३ स्क्वेअर फूट आहे तर अजयने यासाठी 45.09 कोटी रुपये दिले आहेत.

याव्यतिरिक्त अजय देवगनची इतर अनेक मालमत्ता (Ajay Devgn Wealth) असून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक आहे. ADF व्यतिरिक्त, अजयची एक व्हिज्युअल इफेक्ट कंपनी NY VEXWAALA देखील आहे, ज्याचे नाव त्याच्या व काजोलच्या मुलांची नावे न्यासा व युग देवगण यांच्यावर आधारित आहे. (Ajay Devgn Mumbai Property) अभिनेता अजय देवगणने ‘प्रेम रतन धन पायो’ (Prem Ratan Dhan Payo), ‘तमाशा’ (Tamasha), ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani), ‘मेर्सल’ (Mersal), ‘दिलवाले’ (Dilwale), ‘फोर्स 2’ (Force 2) आणि ‘सिम्बा’ (Simmba) यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीमध्ये गुंतवणूक केली होती.

अभिनेता अजय देवगनच्या (Actor Ajay Devgn) मुंबईमध्ये अनेक प्राईम लोकेशनला प्रॉपर्टी आहेत. यामध्ये आता वाढ झाली असून ही नवीन जागा अजयने नेमक्या कोणत्या ऑफिससाठी केली हे अजून कळलेले नाही. अभिनेता अजय देवगनचा ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप चालला. आता तो ‘सिंघम 3’ (Singham 3) या चित्रपटात झळकणार असून यामध्ये तो दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सोबत काम करणार आहे. दीपिका लेडी डॉन म्हणून या चित्रपटात काम करणार आहे. तर अजय देवगन व रोहित शेट्टी (Rohit Shetty) पुन्हा एकत्र काम करणार असून गोलमालचा (Golmaal) पुढील सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत.

Web Title : Actor Ajay Devgn | ajay devgn bought five expensive office properties in posh area of mumbai invest crores check details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तारण ठेवलेले दागिने मोडून जबरदस्तीने कार नेली; 18 लाखांची मागणी करणाऱ्या सावकराला अटक

Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर हॉटेलमध्ये घुसून 12 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बहाण्याने केली लाखो रुपयांची फसवणूक

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

Pune Crime News | पुणे: गुन्हे शाखेतील पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल ! 2 पोलिस, महिलेसह 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा

LPG Gas Cylinder Price | व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update | अनेक भागात पावसाची संततधार; कोकणात ‘ऑरेंज’ तर विदर्भासह मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’