Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Kolhe | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निर्णयानंतर राज्यभरात महाभूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) बंड केल्यानंतर आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासोबत जायचे की अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा या द्विधा मनस्थितीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडकले असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मोठे विधान केले आहे.

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे बोलले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात पुन्हा खळबळ माजली आहे. दरम्यान, अमोल कोल्हे हे शपथविधीदरम्यान अजित पवार यांच्यासोबत होते. पण त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मी एका कामानिमित्त दादांकडे गेलो होतो. मला शपथविधीबाबत काही कल्पना नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मी कायम शरद पवारसाहेब यांच्यासोबतच असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title :   Amol Kolhe | ncp mp amol kolhe to resign as a member of parliament

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 4 July Rashifal : वृषभ, कर्क आणि तुळ राशीवाल्यांच्या इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या इतर राशींची स्थिती

Actress Radhika Madan | अभिनेत्री राधिका मदनचे नवे हॉट देसी फोटोशूट; नेटकऱ्यांच्या नजरा फोटोवर खिळल्या.