Maharashtra Monsoon Update | अनेक भागात पावसाची संततधार; कोकणात ‘ऑरेंज’ तर विदर्भासह मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | राज्यातील काही भागात पाऊस (Maharashtra Monsoon Update) सुरू आहे, तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबईसह उपनगरात (Mumbai) मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे (Thane), पालघरसह (Palghar) कोकणातही (Konkan) चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) कोकणात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला. विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada) आणि पश्चिम महाराष्ट्रात (West Maharashtra) पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे (Maharashtra Monsoon Update) मुंबईतील पाणीसाठा वाढला आहे. धरण क्षेत्रात (In Dam Area) चांगला पाऊस झाल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.

दरम्यान, या चालू जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने शेतीची कामे विस्कळीत झाली आहेत. पेरण्या ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

संपूर्ण देशात मान्सून दाखल –

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. मान्सून साधारणपणे दरवर्षी 8 जुलै रोजी भारतात दाखल होतो. मात्र यंदा संपूर्ण देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्याच्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

उत्तर भारतातही पावसाचा जोर –

हवामानाच्या अंदाजानुसार (IMD) उत्तर भारतातही (North India) मुसळधार पाऊस सुरू आहे. देशाची राजधानी दिल्लीतही (Delhi) चांगला पाऊस पडत आहे. काही भागात पाणी साचले आहे. त्याचवेळी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे उन्हापासून दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title :  Maharashtra Monsoon Update | maharashtra rain konkan orange alert for rain in various parts of the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 4 July Rashifal : वृषभ, कर्क आणि तुळ राशीवाल्यांच्या इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या इतर राशींची स्थिती

Actress Radhika Madan | अभिनेत्री राधिका मदनचे नवे हॉट देसी फोटोशूट; नेटकऱ्यांच्या नजरा फोटोवर खिळल्या.

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

Devendra Fadnavis | “ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील” – देवेंद्र फडणवीसांची माहिती

LPG Gas Cylinder Price | व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर