LPG Gas Cylinder Price | व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : LPG Gas Cylinder Price | 1 जून रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची (Commercial Gas Cylinder) किंमत 83 रुपयांनी कमी झाल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु, यावेळी तेल कंपन्यांकडून (Oil Company) दि. 4 जुलैला गॅस सिलिंडरच्या किमती (LPG Gas Cylinder Price) वाढल्या असल्याचे दिसत आहे. यावेळी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर 7 रुपयांनी वाढवला आहे.

दरम्यान, दि. 1 जुलै रोजी गॅस सिलिंडरच्या दरात (घरगुती आणि व्यावसायिक) कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. मात्र आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder Price) महागला आहे.

तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सात रुपयांनी वाढ केली आहे. तसेच दिल्लीत (Delhi) व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत 1773 रुपयांवरून 1780 इतकी वाढली आहे. दुसरीकडे, घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सलग तीन वेळा दरात कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडर दरात कपात झाली होती. मात्र, मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या दरात मोठी वाढ झाली होती.

Web Title :  LPG Gas Cylinder Price | bug blow to lpg customers 19 kg commercial gas cylinder rates increased by rs 7 check new rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 4 July Rashifal : वृषभ, कर्क आणि तुळ राशीवाल्यांच्या इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या इतर राशींची स्थिती

Actress Radhika Madan | अभिनेत्री राधिका मदनचे नवे हॉट देसी फोटोशूट; नेटकऱ्यांच्या नजरा फोटोवर खिळल्या.

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

Devendra Fadnavis | “ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील” – देवेंद्र फडणवीसांची माहिती