Man vs Wild : PM मोदी, ‘रजनीकांत’ नंतर आता शोमध्ये दिसणार ‘खिलाडी’ अक्षय कुमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुपरस्टार रजनीकांत नंतर आता बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमार देखील डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित होणाऱ्या ‘Man vs Wild’ या टेलिव्हिजन लोकप्रिय शो मध्ये दिसणार आहे. पंतप्रधान मोदी आणि सुपरस्टार रजीकांतनंतर आता अक्षय कुमार होस्ट बेयर ग्रिल्ससह जंगलात सफारी करताना आणि विविध चित्तथरारक प्रकार करताना दिसेल.

माहिती मिळत आहे की ‘Man vs Wild’ या शोच्या शुटिंगसाठी अभिनेता अक्षय कुमार मैसूर विमानतळावर दाखल झाला आहे. पंतप्रधान मोदींबरोबर बेयर ग्रिल्सने ऍपिसोड  शूट केल्यानंतर नव्या वर्षात तो रजनीकांत आणि अक्षय कुमारचे शो घेऊन येत आहे. अशी देखील माहिती आहे की, रजनीकांतचे शूट पूर्ण झाले असून उद्या अक्षय कुमार बेयर ग्रिल्ससह शूट करणार आहे.

रजीकांतचे शूट कर्नाटकमधील बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये झाले आहे. तर बेयर ग्रिल्सने आज अक्षय कुमारसाठी याच टायगर रिझर्व्हमधील जागेची पाहणी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा