अभिनेते Yada Krishna यांचे 61 व्या वर्षी निधन, सोशल मीडियावर फॅन्स देत आहे श्रद्धांजली

नवी दिल्ली : टॉलीवुड अभिनेते आणि निर्माते यदा कृष्णा यांचे काल हैद्राबादमध्ये वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. यदा कृष्णा यांनी अभिनेता म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि निर्माता म्हणून सुद्धा अनेक चित्रपटांची निर्मिती सुद्धा केली आहे.

तेलगू चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते यदा कृष्णा यांना त्यांचे फॅन्स सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली देत आहेत. यदा कृष्णा शेवटचे, संक्रांती अल्लुडु चित्रपटात दिसले होते. व्हीव्हीव्ही सत्यनारायण दिग्दर्शित, या चित्रपटात सुनक्षी, रोशनी, एव्हीएस, अनंत, रघुनाथ रेड्डी, चिट्टी बाबू, जीवा, कोंडावलसा, रंगास्वामी, नागैया नायडू, कविता, सुधा आणि अन्य कलाकार होते.

You might also like