Actor Arbaaz Khan | अखेर अरबाज खानने 21 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडला डेट करण्याबाबत तोडले मौन, म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अरबाज खान (Actor Arbaaz Khan) त्याच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. तो म्हणजे त्याची माजी पत्नी मलायका अरोरामुळे (Malaika Arora). दरम्यान मलायका अरोराला 2017 मध्ये घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खान आपल्यापेक्षा 21 वर्षांनी लहान इटालियन मॉडेल (Italian Model) आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला (Giorgia Andriani) डेट करत आहे. महत्वाची बाब म्हणजे अरबाज आणि जॉर्जिया हे एक लोकप्रिय जोडपे बनले आहेत. पण दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या वयातील अंतरामुळे त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते. पण आता अरबाज खानने (Actor Arbaaz Khan) आता त्याची गर्लफ्रेंड जॉर्जियाबद्दल उघडपणे बोलले आहे.

 

दरम्यान अलीकडेच अरबाज खानने एक मुलाखत दिली आहे.या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल (Actor Arbaaz Khan Personal Life) खुलेपणाने सांगितले आहे.अरबाज खानने त्याची गर्लफ्रेंड जॉर्जियाबद्दल सांगितले की, ‘ती एक अद्भुत मुलगी आहे. तसेच आम्ही दोघ खूप चांगले मित्र आहोत. इतकच नाही तर, तिच्याकडे उत्कटता आणि ऊर्जा आहे. आणि त्याच सकारात्मक दृष्टिकोनातून मलाही ऊर्जा मिळाली आहे. तसेच हे अनेकवेळा घडले आहे. विशेष म्हणजे लोक एकमेकांना ऊर्जा देतात, पण ते तुमच्या आयुष्यात कोण आणि कोणत्या वेळी येते यावर अवलंबून असते.

 

तसेच पुढे अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानी आणि त्याच्या वयात असलेल्या अंतराबद्द्ल म्हणाला की ‘आमच्यात वयात खूप अंतर आहे, पण आमच्या दोघांनाही हा फरक जाणवला नाही. मी कधी कधी तिला विचारतो की , ‘खरंच असं?’ जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये जाता तेव्हा तुम्ही फार पुढचा विचार करत नाही. परंतु तुम्ही जितके जास्त वेळ एकत्र राहाल तितके जास्त प्रश्न तुमच्याकडे असतील ज्यांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. मला वाटते की आपण आपल्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर आहोत आणि आपल्याला हे कसे पुढे न्यायचे आहे याचा विचार करत आहोत.

खरतर अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता.
दरम्यान या दोघांना अरहान नावाचा एक मुलगा आहे मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासाठी एकत्र दिसतात.
पण दोघेही वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत.
हत्वाची बाब म्हणजे अरबाज बऱ्याच दिवसांपासून जॉर्जियाला डेट करत आहे
आणि मलायकाही अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) तिच्या आयुष्यात आनंदी आहे.

 

Web Title :- Actor Arbaaz Khan | arbaaz khan talk about girlfriend giorgia andriani and 21 year age difference with her

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Salaam Venky Movie| ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज , अभिनय आणि संवाद जिंकतील तुमचे मन

Jitendra Awhad | ‘असल्या आरोपांतून घरे उद्धवस्त होतील, त्यापेक्षा राजकारणात न राहिलेले बरे’ – जितेंद्र आव्हाड

Radhakrishna Vikhe Patil | राज ठाकरेंच्या भविष्यवाणीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…