Jitendra Awhad | ‘असल्या आरोपांतून घरे उद्धवस्त होतील, त्यापेक्षा राजकारणात न राहिलेले बरे’ – जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर भाजपच्या (BJP) पदाधिकारी महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आव्हाडांनी या सर्व प्रकारात राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपण राजीनाम्याच्या निर्णयापर्यंत का पोहोचलो, यासाठी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. या परिषदेत त्यादिवशी नेमके काय घडले, याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी आव्हाड म्हणाले, खून किंवा इतर कोणताही गुन्हा असता, तर ठीक होता. पण, विनयभंगाचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला आहे. मी आयुष्यात कधी असे केले नाही. पोलिसांनी कसा काय गुन्हा दाखल केला, हे कळायला मार्ग नाही. मी काय शब्द वापरले, तो व्हिडिओ पण माझ्याकडे आहे. समाजात माझी मान शरमेने खाली जाईल, यासाठी हे षड्यंत्र आहे. माझ्या मुलीला तिच्या मैत्रीणी विचारत आहेत, की तुझ्या वडिलांनी विनयभंग केला का? त्यामुळे या राजकारणात न राहिलेले बरे. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण होऊ नये. लोकांची घरे उध्दवस्त होतील.
पोलिसांनी गेल्या ७२ तासांत माझ्यावर २ खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी पोलिसांच्या या अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी मी नाही पाहू शकत, असे ट्वीट देखील आव्हाडांनी केले होते.

जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सर्वप्रथम त्या घटनेची चित्रफीत उपस्थितांना दाखविली.
त्यानंतर त्यांनी भारतीय दंड विधानाप्रमाणे (Indian Penal Code) 354 ची विनयभंग किंवा बलात्काराची
व्याख्या वाचून दाखविली. यानंतर यात आव्हाड कुठे बसतात, असा प्रश्न उपस्थित करत,
पोलिसांनी गुन्हा कसा काय दाखल केला असे म्हंटले.

Web Title :-  Jitendra Awhad | a molestation case registered against jitendra awhad ncp mla upset with article 354 against him

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | मार्केट यार्ड गोळीबार प्रकरण ! कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक; आरोपींमध्ये मंगळवार पेठ, रामनगर-वारजे, शिवणे, शिवाजीनगर परिसरातील तरूणांचा समावेश

Patthe Bapurao Award | पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर ! तांबे, बारामतीकर व कुडाळकर पुरस्काराचे मानकरी; अमन तांबे यांना पठ्ठे बापुराव पुरस्कार, लावणी महोत्सवाचे आयोजन

Haryanvi Dancer Gori Nagori | हरियाणवी डान्सर गोरी नागोरीच्या ‘या’ गाण्यावरील डान्स पाहुन चाहते झाले घायाळ, सोशल मिडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल (VIDEO)