‘आरक्षण’ फेम अभिनेता अन् सेवानिवृत्त लष्करी अधिकारी बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   आरक्षण चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते ब्रिकमजीत कंवरपाल यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यातच त्यांचे आज निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये भूमिका साकारली होती. अखेर आज त्यांचे निधन झाले.

52 वर्षीय बिक्रमजीत कंवरपाल हे सेवानिवृत्त लष्करी अधिकारीही होते. त्यांनी लष्करातील सेवेदरम्यान विशेष असे काम केले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. बिक्रमजीत यांनी अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ट्विट करून त्यांनी म्हटले, की ‘आज सकाळी कोरोनामुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. त्यांनी बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांचे मी सांत्वन करतो’.

दरम्यान, 2003 मध्ये ब्रिकमजीत कंवरपाल यांनी अभिनय क्षेत्रात सुरुवात केली. ‘मर्डर 2’, ‘2 स्टेट्स’, ‘पेज 3’, ‘रॉकेट सिंग : सेल्समॅन ऑफ द इअर’, ‘आरक्षण’ आणि ‘द गाजी अटॅक’ यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारल्या.

कोरोनामुळे अनेकांचे निधन

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना मृतांचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. आत्तापर्यंत अनेक राजकीय, सामाजिक, अभिनय क्षेत्रातील व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात आता ब्रिकमजीत कंवरपाल यांचाही मृत्यू झाला आहे.