Actor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज झाला बेरोजगार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले तर अनेकांचे आयुष्य विस्कळीत झाले आहे. सिने क्षेत्रातील लोकांनाही कोरोनाचा (corona) फटका बसला असून अभिनेता चेतन हंसराज (Actor Chetan Hansraj) हे त्यापैकीच एक आहेत. एकेकाळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही वरील अभिनेत्यांपैकी एक अभिनेता चेतन हंसराजची (Actor Chetan Hansraj) ओळख आहे. आज त्याचा वाढदिवस (Birthday) पण आज त्याच्याकडे मित्रांना पार्टी देण्याइतपतही पैसे नाही आहेत.

छोट्या पडद्यावरील एक नामांकित कलाकार म्हणून चेतनेची ओळख आहे. क्यो होता है प्यार या सुपर हिट मालिकेच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला. त्याने शूssss कोई है, सीआडी, कैसा ये प्यार है, कुटुंब, कहानी हमारे महाभारत की यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. प्रामुख्याने त्याची खलनायकाची भूमिका गाजली आहे. टीव्हीवरील सर्वाधिक व्यस्त कलाकारांपैकी तो एका होता. मात्र कोरोनावाच्या संकटामुळे त्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.

सध्या तो बेरोजगार (Unemployed) असून त्याच्याकडे वाढदिवसानिमित्त मित्रांना पार्टी द्यायला पैसे नाहीत. आपल्या परिस्थितीबाबत हंसराजने न्यूज ट्रॅकला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे इतर कलाकारांप्रमाणे मीही घरी बसून आहे. सध्या माझ्याकडे काहीच काम नाही. कोरोनापूर्वी जे काही काम केले होते त्याचेही पैसे (Money) अद्याप मिळालेले नाही. बचत केलेल्या पैशातून कर्जाचे हप्ते आणि उदरनिर्वाह सुरु आहे. पण हे किती दिवस सुरु राहील हे सांगता येत नाही. सध्या आर्थिकी स्थिती (Financial status) खूप बिकट असल्याचेही त्याने सांगितले. दरम्यान हंसराजच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय तो पुन्हा एकदा टीव्हीवर (TV) काम करताना दिसेल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

Wab Title :- actor chetan hansraj in financial crisis due to coronavirus

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

Pune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा एक्सप्रेस’ मधून फेकलं, एकचा जागीच मृत्यू

धक्कादायक ! प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा