पाठ्य पुस्तकात धावपटू मिल्खा सिंग ऐवजी अभिनेता फरहान अख्तरचा छापला फोटो

कोलकाता : वृत्तसंस्था

पश्चिम बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तकात ‘फ्लाईंग शिख’ धावपटू मिल्खा सिंग म्हणून चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापला आहे. त्यामुळे सध्या हा विषय सोशल मिडियावर चर्चेचा बनला आहे.

धावपटू मिल्खा सिंग यांच्या फोटोऐवजी फरहान अख्तरचा फोटो छापल्याचा प्रकार लक्षात येताच अभिनेता फरहान अख्तरने स्वत: याबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केली. तसेच, पश्चिम बंगालच्या शिक्षणमंत्र्यांकडे हा चुकीचा छापण्यात आलेला फोटो बदलण्याचीही विनंती केली आहे. यावर, पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले की, फरहान अख्तर यांनी केलेल्या ट्विटबद्दल माहिती मिळाली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या चुकीबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B077PVYCJW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3b5681db-a43f-11e8-a66d-fbceae36ffcf’]

भारतीय क्रीडा क्षेत्रात मिल्खा सिंग यांचे मोठे योगदान आहे़  भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. धावपटू म्हणून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे़ १९५८ साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. त्यांच्या या कामगिरीवरुन त्यांना फ्लार्इंग शिख म्हणून संबोधले जाते़ या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना १९५९ मध्ये पद्यश्री देऊन गौरव केला आहे़ मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र द रेस आॅफ माय लाइफ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.

ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेमुळे पाठ्यपुस्तकात मिल्खा सिंग ऐवजी फरहान अख्तरचा चुकीचा फोटो छापण्यात आल्याचे दिसून येते.