Actor Prabhas | प्रभासने प्रोजेक्ट-के साठी कोट्यवधी रुपये मानधन घेतले असा दावा; निर्मात्यांनी केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता प्रभास (Actor Prabhas) हा त्याच्या चित्रपटांमुळे व मानधनामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘आदिपुरुष’ चित्रपट (Adipurush Movie) प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला व प्रभासला देखील खूप ट्रोल केले. यानंतर आता प्रभास त्याच्या ‘प्रोजेक्ट के’(Project K) व ‘सालार’ (Salaar Part 1 – Ceasefire) या बिग बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता प्रभासाचा (Actor Prabhas) मागील चित्रपट जोरात आपटला असला तरी त्याने पुढच्या चित्रपटासाठी 150 कोटी रुपये मानधन (Actor Prabhas Fees) घेतले असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. यावर ‘प्रोजेक्ट के’ च्या निर्मात्यांनी स्वत: खुलासा केला आहे.

‘प्रोजेक्ट के’ चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास, अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) व अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची कथा हिंदू पौराणिक कथेवरच आधारित आहेत. ज्याप्रकारे भगवान विष्णू हे दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेतात. त्याच प्रमाणे त्यांचा आपल्या युगात जन्म होणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे प्रभास ती भूमिका साकारणार असून कशा प्रकारे दृष्टांचा नाश होतो. हे दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा विष्णू अवतारावर आधारित असणार आहे. या प्रोजोक्ट के साठी प्रभासने 150 कोटी रुपये मानधन घेतले आहे असे बोलले जात आहे यावर चित्रपटाची निर्माती प्रियांका दत्ता (Priyanka Dutta) हीने स्पष्ट मत मांडले आहे.

प्रोजोक्ट के चित्रपटाची निर्माती प्रियांका दत्ता प्रभासच्या मानधनावर व्यक्त झाली आहे. ती म्हणाली की, ही बातमी खरी नाही तर फक्त अफवा आहे. बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अशा अफवा पसरणे ही साधारण गोष्ट आहे. अशा प्रकारच्या बातम्या तेव्हाचा बोलल्या जातात जेव्हा निर्माते यावर काही बोलत नाही. पण हे मानधनाबद्दल खरे नाही.

प्रोजेक्ट के बिग बजेट चित्रपट असून हा एक सायन्स फिक्शनवर आधारित सिनेमा आहे. चित्रपटाचे शुटिंग चालू आहे मात्र शुटिंगदरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन यांना दुखापत झाल्याने चित्रपटाच्या शुटिंगला विलंब होत आहे. आता मात्र बीग बी (Big B) बरे झाले असून चित्रिकरणास पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा बहुचर्चित चित्रपट पुढच्या वर्षी 12 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन (Director Nag Ashwin) यांनी केले असून चित्रपटाची स्टार कास्ट अतिशय तगडी आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रभाससोबत अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) व सूर्या (Surya) हे देखील कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Web Title : Actor Prabhas | prabhas took huge amount for project k producer claims it as false information

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या वयावरुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

Pune: Newly-married girl ends life by jumping into Indrayani river; She was being harassed to get money from her parents’ house

Neelam Gorhe join Shivsena | नीलम गोऱ्हेंचा शिवसेनेत प्रवेश, फडणवीस यांची आश्चर्यकारक उपस्थिती (व्हिडिओ)

Parag Karandikar | अभिमानास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती

Pooja Hegde | अभिनेत्री पुजा हेगडेच्या हॉट फोटोशुटवर नेटकरी फिदा; बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो व्हायरल

Actress Madhoo | ‘रोजा’ सारखा हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री मधूने अचानक का सोडली इंडस्ट्री; सांगितले खरे कारण

Katrina Kaif | कतरिनाचा चाहत्यांसोबत कूल अंदाज; नेटकरी करत आहेत कौतुक