Devendra Fadnavis | शरद पवारांच्या वयावरुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज शिवसेना शिंदे गटात (Shinde Group) जाहीर प्रवेश (Neelam Gorhe join Shivsena) केला. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. निलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप (BJP) नेते उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना टोला लगावला.

शिवसेनेच्या पक्षप्रवेशावेळी तुम्ही इथे कसे? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारला. यावर त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. शिवसेना आणि भाजप ही एक भावनिक युती आहे. निलम ताई आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत म्हणूनच मी त्यांच्या प्रवेशासाठी इथे उपस्थित आहे. त्यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश केला नसून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार पुढे नेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर आगामी सभापती निवडणुकीवर (Speaker Election) आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करु, असेही फडणवीस यांनी सांगितले.

लोकशाहीसाठी विरोधी पक्ष महत्त्वाचा असून लक्ष विचलित असलेला विरोधी पक्ष असणे ठीक नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितल्याप्रमाणे ते देखील सभा घेतली. आमच्या देखील सभांना 30-40 हजार लोक येत असतात. शरद पवारांना 100 वर्ष आयुष्य लाभावे असे आम्हाला वाटते. मात्र, सहानुभूती मिळवण्यासाठी काही कार्यकर्ते त्यांच्या वयाचा दाखला देत आहेत पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Web Title :   Devendra Fadnavis | Devendra Fadnavis’ attempt to get sympathy from Sharad Pawar’s age

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Constable Suicide News | पुण्यात पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत केली आगळी वेगळी मागणी

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या आजचे दर

Maharashtra State Election Commission | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही