Actress Madhoo | ‘रोजा’ सारखा हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री मधूने अचानक का सोडली इंडस्ट्री; सांगितले खरे कारण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचे 90 चे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रीने अचानकच इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीच्या या निर्णायाने प्रेक्षकांसह सर्वांना आश्चर्य वाटले होते. ही अभिनेत्री म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मधू (Actress Madhoo), अभिनेत्री मधूने रोजा (Roja), योद्धा (Yoddha), दिलजले (Diljale), फुल और कांटे (Phool Aur Kaante) यासारखे अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहे. मधूच्या अभिनयाची सर्व चाहत्यांवर भूरळ होती. मात्र यशाच्या शिखरावर असताना तिने अचानक सिनेविश्वातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री मधूने (Actress Madhoo) यामागचे खरे कारण सांगितले आहे.

अभिनेत्री मधूने 90 च्या दशाकामध्ये अनेक हिट चित्रपट (Madhoo Hit Movies) दिले मात्र तरीही तिच्या पदरी भूमिकांच्या बाबतीत निराशाच पडत होती. उत्तम अभिनय कौशल्य असूनही अभिनेत्री मधूला चांगल्या भूमिका ऑफर केल्या नव्हत्या. सर्व भूमिकांमध्ये नायकाचे काम अधिक प्रकर्षाने दाखवले जात होते. त्यामुळे ती नाराज झाली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मी अनेक चित्रपटांमध्ये नृत्य केले आहे. मला डान्स करायला आवडतो पण ‘रोजा’ मध्ये काम केल्यानंतर मला पुन्हा डान्स करावा असे अजिबात वाटत नव्हते. माझ्या शूटिंगच्या तारखा जवळ आल्या की मी नाराज व्हायचे. तेव्हाच मी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी इंडस्ट्री सोडत असल्याचे पत्र लिहिले व सर्वांना पाठवले. हे पत्र लिहिण्यामागचा माझा हेतू असा होता की त्या सर्वांना सांगावे की तुम्ही लोक मला डिजर्व करत नाहीत. माझे हे वागणे बालिश आणि थोडे रागावलेले होते.

अभिनेत्री मधूने (Actress Madhoo) नंतर सांगितले की माझे हे वागणे चूकीचे आहे याची मला जाणीव झाली. मी कलाकार आहे आणि ते करणे हे माझे काम आहे. त्यामुळे मी माझा हट्ट सोडून पुनरागमन केले. अभिनेत्री मधु ही शेवटची ‘शकुंतला’ चित्रपटात (Shakuntala Movie) मनेकाच्या भूमिकेत झळकली होती. या चित्रपटात मधूसोबत सामंथा रुथ प्रभू महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. नुकताच मधुचा तमिळ वेब शो स्वीट करम कॉफी (Sweet Karam Coffee) देखील रिलीज झाला आहे. अभिनेत्री मधूने पूर्वी तामिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती बॉलीवुडमध्ये काम करत होती.

Web Title :  Actress Madhoo | madhoo reveals why she decided to quits films wrote letters to industry people after deciding to quit films

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde | पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक, काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम; म्हणाल्या – ‘जे काही करायचं ते डंके की चोट पर करेन’ (व्हिडिओ)

Lohegaon To Hadapsar PMPML Bus | लोहगाव ते हडपसर बससेवा सुरू ! आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश

Pune Crime News | पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटेंनी घेतली जबरी चोर्‍या करणार्‍या आरोपींची ओळख परेड, 65 सराईतांच्या माहितीचे आदान प्रदान

Pune Crime News | ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

Pankaja Munde Dhananjay Munde Reunite | मुंडे बहिण-भावात दिलजमाई, पंकजांकडून धनूभाऊचं चांदीच्या ताटातून औक्षण (व्हिडिओ)

Maharashtra State Election Commission | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही