अभिनेता राजपाल यादवला ३ महिन्यांचा कारावास 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेक बाऊन्स प्रकरणी बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव याला ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. २०१० साली राजपाल याने इंदौर येथील सुरेंद्र सिंह या व्यक्तीकडून ५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. तसेच काही दिवसात पैसे परत करतो असे आश्वासनही त्याने सिंह यांना दिले होते.

दिलेली मुदतीत यादव पैसे परत करत नसल्याने सिंह यांनी यादवच्या मागे तगादा लावला होता. यामुळे 2015 साली यादव याने मुंबईतील अॅक्सिस बँकेचा एक चेक सिंह यांना दिला. पण तो चेक बाऊन्स झाला. यामुळे सिंह यांनी वकीलाकडून यादव याला नोटीस पाठवली. तरी देखील यादव याने कर्ज फेडले नाही. यामुळे सिंह यांनी येथील जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने सिंह व यादव यांना सामंजस्याने हा वाद सोडवण्याचा अनेकदा सूचना दिल्या. मात्र, यादवने गंभीरपणे न घेता सिंह यांचे कर्ज फेडलेच नाही. यामुळे त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

बोदवड येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू 
जळगाव : एका २० वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना करंजी- पाचदेवळी तालुका बोदवड येथे काल रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. पाच ते सहा महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते.प्रियंका गोपाळ पाटील (वय २०) असं या मृत महिलेचं नाव आहे. गोपाळ शालीग्राम पाटील (वय २४) यांच्याशी तिचे लग्न झाले होते. कॅमेरा घेण्यासाठी माहेरहून १० हजार रुपये आणावेत, यावरुन दोघा पती – पत्नीत वाद झाला होता. यातून तिने रात्री गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याचप्रमाणे गोपाळ यानेच मुलीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप प्रियंकाच्या आईने केला आहे.