‘बम डिगी डिगी बम’ गाण्यावर अभिनेत्री अदा शर्मानं केला आजीसोबत डान्स ! व्हिडीओ ‘व्हायरल’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अदा शर्मा आपल्या लुक आणि फॅशन सेंससाठी ओळखली जाते. इव्हेंट असो किंवा कॅज्युअल आऊटिंग अदाचा लुक पाहण्यासारखा असतो. आपल्या लुकमुळे सोशलवरही ती चर्चेत असते. अदा नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. अदाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती आपल्या आजीसोबत डान्स करत आहे.

अदानं अलीकडचे तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. अदा यात डान्स करत आहे. खास बात अशी की, तिची आजीही तिच्या सोबत थिरकताना दिसत आहे. बॉलिवूडमधील गाणं बम डिगी डिगी बम या गाण्यावर दोघी डान्स करत आहेत. आणखी एका व्हिडीओत अदा आजीकडून रॅम्प वॉक शिकताना दिसत आहे. अदाचा हा व्हिडीओ जुनाच आहे. आजीची आठवण येत असल्यानं लॉकडाऊनमध्ये तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना अदा म्हणते, “अशा लोकांना टॅग करा. ज्यांना लॉकडाऊन संपल्यानंतर भेटण्यासाठी तुम्ही आतुर झाला आहात. या लिस्ट मध्ये सर्वात पहिलं नाव माझ्या आजीचं आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर मी सर्वात आधी तिला भेटणार आहे.”

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अदा काही दिवसांपूर्वी आलेल्या कमांडो 3 सिनेमात दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 2008 साली आलेल्या 1920 या सिनेमातून अदानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. अदानं कमांडो 2, हंसी तो फंसी या सिनेमातही काम केलं आहे.