Devendra Fadnavis | जाहिरातीवरील शरद पवारांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अशा गोष्टींना…’

धाराशीव : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | शिंदे गटाकडून (Shinde Group) ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात देऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर भाजप (BJP)-शिंदे गटाच्या कार्यकर्ते-नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या जाहिरात वादावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना सरकारमध्ये भाजपाचं जास्त योगदान सल्याचं जाहिरातीमधून समजलं असा खोचक टोला लगावला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मला शरद पवारांना काहीही उत्तर द्यायचे नाही. अशा गोष्टींना थोडेच उत्तर द्यायचं असतं. आमच्याकडे भरपूर कामे आहेत, अशा गोष्टींवर उत्तर का द्यायचं. धाराशीवची जागा भाजप लढवणार की शिवसेना (Shivena) या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्या पक्षाचं संसदीय मंडळ आहे, केंद्रीय नेतृत्व आहे. धारशीवच्या जागेवर आमचं केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र बसू, कुठेही काही अडचणी असतील तर त्या सोडवू.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले, आम्हालाही हे आत्ताच कळलं. महाराष्ट्राचे हे भाग्य आहे. अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दल नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही. आमचा समज असा होता की, हे जे सरकार बनले आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. या जाहिरातीमुळे आम्हा लोकांच्या मनात भर पडली की, भाजपचे यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांचे आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचे ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या (Advertising) माध्यमातून झाले आहे. याबद्दल त्यांना धन्यवाद, अशा खोचक शब्दात पवार यांनी भाजप-शिंदे गटाला कानपिचक्या दिल्या.

प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढवावी

शेवटी सगळ्या पक्षाच्या पादधिकाऱ्यांना आपण, आपल्या पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे हे वाटतं.
आमच्याही पक्षातील लोकांना वाटतं की, सगळीकडे आपण निवडणूक लढवावी.
तसेच त्यांच्याही पक्षातील लोकांना वाटतं. त्यात काहीही वावगं नाही.
आम्ही दोघे एकत्र आहोत आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे.
त्यामुळे मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी ज्या व्यक्तीने आणि ज्या पक्षाने निवडणूक लढणे आवश्यक असेल
ते लढतील, असं मत देवेंद्र फडणवीस त्यांनी व्यक्त केलं.

Web Title :  Devendra Fadnavis | devendra fadnavis answer sharad pawar over advertisement dispute criticism

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actor Tamanna Bhatia | तमन्नाच्या ‘या’ नव्या वेबसिरीजमधील अभिनयावर प्रेक्षक फिदा

Pune Crime News | कात्रज-आंबेगाव बु. परिसरात दशहत निर्माण करणार्‍या प्रेम शिंदे टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई

Jayant Patil | ‘या’ घटनांचा उल्लेख करत जयंत पाटलांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र