‘कास्टींग काऊच’बद्दल अभिनेत्री चित्रांगदाचा ‘खुलासा’ ! सांगितला ‘अनुभव’

पोलिसनामा ऑनलाइन –आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलेब्सनं कास्टींग काऊचबद्दल आपला अनुभव शेअर केला आहे. आता अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिनंही आपला अनभव सांगितला आहे. तिनं सांगितलं आहे की, अनेकदा तिला याचा सामना करावा लागला आहे.

चित्रांगदा सिंह म्हणते, “अशा प्रकारची लोकं सर्वच ठिकाणी आहेत. माझ्या मॉडेलिंगच्या काळापासून तर बॉलिवूडपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी अशा लोकांचा सामना केला आहे. कॉर्पोरेट इंडस्ट्रीचीही अशीच अवस्था आहे. माझ्यासोबतही असं झालं आहे. परंतु फिल्म इंडस्ट्री ही एक अशी जागा आहे जिथं कोणी कोणाला फोर्स करत नाही. इथं प्रत्येकाकडे पुरेशी जागा आणि आहे. प्रत्येकजण आपला निर्णय घेऊ शकतो.

पुढे बोलताना चित्रांगदा म्हणते, तुम्हाला तेव्हा खूप वाईट जेव्हा तुमची एखादी संधी केवळ या गोष्टीमुळं हिरावून घेतली जाते. परंतु ही तुमची चॉईस आहे. जर कुणी कॉम्प्रोमाईज करायला तयार असेल आणि त्याला ही संधी गमवायची नसेल तर ही त्याची मर्जी आहे.” असंही तिनं यावेळी सांगितलं.

अलीकडेच एका इंग्रजी वेबसाईटसोबत बोलताना आयुष्मान खुराानंही असा काही खुलास केला होता. तो म्हणाला होता की,, “मला कास्टींग डायरेक्टर म्हणाला होता की, मी तुला लीड रोल देईन जर तू मला तुझं टूल दाखवलं तर. मी खूप नम्रपणे यासाठी नकार दिला.”