Actress Kiara Advani | लॉकडाऊन नंतर सर्वात हिट चित्रपट देणारी अभिनेत्री ठरली कियारा अडवाणी; सध्या आहे यशाच्या शिखरावर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडच्या सिताऱ्यांचा लोकांमध्ये नेहमीच बोलबोला असतो. बॉलीवुड अभिनेत्रींमध्ये काही नावे अशी आहेत जी अनेक दशकांपासून या सिनेविश्वाची ओळख म्हणून राहिली आहेत. यामध्ये आता एका सुपरस्टार अभिनेत्रीचे नाव जोडले जात आहे ते म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी. (Actress Kiara Advani) ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) या चित्रपटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कियारा अडवाणी ही आता यशस्वी अभिनेत्रींच्या यादीमध्ये समाविष्ट झाली आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी (Actress Kiara Advani) सध्या यशाच्या शिखरावर असून एका मागून एक हिट चित्रपट देत आहे. तिचा तगडा चाहता वर्ग निर्माण झाला असून तिची प्रत्येक फिल्म बॉक्सऑफिसवर गाजत आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणीने 2014 साली ‘फगली’ (Fugly) या चित्रपटातून मनोरंजन विश्वात एन्ट्री केली. पण त्याच वर्षी बॉलीवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या इतर अभिनेत्री कृती सेनॉन (Actress Kriti Sanon), रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) व भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्यापुढे कियाराच्या डेब्युकडे प्रेक्षकांचे लक्ष गेले नाही. सुरुवातीच्या काळात कियाराला चित्रपट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल करणाऱ्या कियारा आता महत्त्वाच्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे.

पहिल्या चित्रपटातील पदार्पणानंतर कियाराचा दुसरा चित्रपट (Kiara Advani Movie) दोन वर्षांनी आला आणि तिसरा चित्रपट ‘मशीन’ (Machine’) बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. 2014 मध्ये पदार्पण केलेल्या कियारा अडवाणीला 2018 पर्यंत कोणतीही मोठी ओळख मिळाली नाही. 2016 साली तिने ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ (M.S. Dhoni: The Untold Story) या चित्रपटात काम केले. पण कियारा पेक्षा यामध्ये दिशा पटानीच्या अभिनयाचे जास्त कौतुक झाले. पण त्यानंतर आलेल्या कबीर सिंग चित्रपटाने (Kabir Singh Movie) अभिनेत्री कियाराला नवी व दमदार ओळख निर्माण करुन दिली. शाहिद कपूरबरोबर (Shahid Kapoor) काम करणाऱ्या कियाराचे सर्वत्र कौतुक झाले व तिला फेम मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कियाराची घौडदौड थांबली नाही. अभिनेत्री कियाराने ‘गुड न्यूज’ (Good News), शेरशाह (Shershah), गिल्टी’ (Guilty), लस्ट स्टोरीज् (Lust Stories) अशा चित्रपटांमध्ये काम केले. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर व ओटीटीवर खूप कमाई केली. यामधील अभिनयामुळे अभिनेत्री कियारा अडवाणी नावारुपाला आली.

अभिनेत्री कियारा अडवाणी पुन्हा एकदा अक्षय कुमार (Akshay Kumar) सोबत लक्ष्मी चित्रपटात (Lakshmi Movie) झळकली. यामधील तिच्या सौंदर्याचे अनेकांनी कौतुक केले. त्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सोबत ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटात झळकली. यामध्ये कियाराचे काम प्रकर्षाने दिसून आले व ती बड्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये समाविष्ट होऊ लागली. तसेच तिने वरुण धवन (Varun Dhawan) सोबत ‘जुगजुग जियो’ (Jugjugg Jeeyo) सिनेमा देखील काम केले. आता तिचा आणखी एक सिनेमा ‘सत्यप्रेम की कहानी’ प्रेक्षकांना आवडत असून पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने 40 करोड कमावले आहेत.

बॉलीवुडच्या यशस्वी व महत्त्वपूर्ण अभिनेत्रींच्या पंक्तीमध्ये कियारा अडवाणी (Actress Kiara Advani) देखील दाखल झाली आहे. (Kiara Advani Career) तसेच अभिनेत्री कियारा ही कोरोना नंतर सगळ्यात जास्त हिट चित्रपट देणारी अभिनेत्री बनली आहे. तिचा चाहता वर्ग देखील वाढला असून येणाऱ्या अनेक प्रोजेक्टमध्ये कियाराचे नाव समाविष्ट आहे. (Kiara Advani Hit Movies) अभिनेत्री कियारा अडवाणीला काम न मिळण्यापासून ते यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असून विलक्षण आहे.

Web Title :  Actress Kiara Advani | kiara advani among top bollywood actresses after satyaprem ki katha most hits after lockdown

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik NCP News | नाशिकमध्ये संघर्ष पेटला, भूजबळ-अजित पवार-शरद पवार समर्थक आमने-सामने; पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन राडा

Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

Actress Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींसमोर करत होती अंग झाकण्याचा प्रयत्न; फोटो व्हायरल

Maharashtra Politics News | बहुमत असताना राष्ट्रावादीला सत्तेत का घेतलं? शिवसेना नेत्याने सांगितले कारण

Actress Ameesha Patel | बॉलीवुडच्या एका निर्मात्यासोबतच्या अफेअरने बर्बाद केले अमिषा पटेलचे पूर्ण करिअर; आता होतोय पश्चाताप

Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य; अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, घेतले 8 महत्त्वाचे निर्णय