Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – गेली अनेक पिढ्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री रेखा (Actress Rekha) यांना बॉलीवुडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखल जातं. अभिनयाबरोबरच त्यांच्या फॅशनला आजही चाहत्यांकडून दाद मिळते. अभिनेत्री अनेक इव्हेंटमध्ये व शोमध्ये सहभागी होताना दिसतात. कांजीवरम साडी मधील त्यांचा हा लूक अनेकांना आवडतो. मात्र अभिनेत्री रेखाजींना (Actress Rekha) गेली 10 वर्षे प्रेक्षक मोठ्या पडद्यावर पाहू शकलेले नाही. मागील 10 वर्षात कोणताही सिनेमा का केला नाही याबाबत अभिनेत्री रेखा यांनी उत्तर दिले आहे.

अभिनेत्री रेखा अगदी बॅल्क अन् व्हाईट सिनेमांपासून आत्तापर्यंत मनोरंजन विश्वामध्ये प्रकाशझोतात आहे. आजही अनेक चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी लाखोंमध्ये प्रेक्षक वर्ग जमा होतो. असे असले तरी त्या गेली 10 वर्षे चित्रपटांपासून लांब आहेत. (Actress Rekha Movie) त्यांनी एकही प्रोजेक्ट स्विकारलेला नाही. 2014 साली रेखा ‘सुपर नानी’ (Super Nani) या चित्रपटात झळकल्या होत्या. मात्र आता त्या चित्रपट का करत नाही यावर त्यांनी एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले. रेखा म्हणाल्या की, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण मला जे काही आवडतं ते निवडण्याचा मला अधिकार मिळाला आहे. याचबरोबर मला विचारण्यात आलेल्या काही प्रोजेक्ट्सना नाही म्हणण्याचाही अधिकार आहे आणि म्हणूनच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मी चित्रपटांत काम केलं किंवा नाही केलं तरीही माझं सिनेमॅटिक व्यक्तिमत्त्व कधीच माझी साथ सोडत नाही. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा योग्य प्रोजेक्ट मला मिळेल. मी कुठे असलं पाहिजे किंवा कुठे नाही हे मी स्वतः निवडते.” असे उत्तर अभिनेत्री रेखाजींनी दिले आहे.

अभिनेत्री रेखाजी (Actress Rekha) अनेक इव्हेंट व शोमध्ये सहभागी होताना दिसतात. छोट्या पडद्यावरील रिएलिटी शोमध्ये त्या उपस्थिती दर्शवतात. यावेळी त्या भारतीय वेशभूषमध्ये कांजीवरम साडीवर हेव्ही ज्वेलरी परिधान करतात. (Actress Rekha Kanchipuram saree) त्या लवकरच ‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये काम करणार आहेत. प्रेक्षक व त्यांचे चाहते त्यांना टीव्हीवरच्या मालिकेमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title :  Actress Rekha | actress rekha reveals why she did not sign any film in last ten years know the reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तारण ठेवलेले दागिने मोडून जबरदस्तीने कार नेली; 18 लाखांची मागणी करणाऱ्या सावकराला अटक

Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर हॉटेलमध्ये घुसून 12 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बहाण्याने केली लाखो रुपयांची फसवणूक

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

Pune Crime News | पुणे: गुन्हे शाखेतील पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल ! 2 पोलिस, महिलेसह 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा

LPG Gas Cylinder Price | व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update | अनेक भागात पावसाची संततधार; कोकणात ‘ऑरेंज’ तर विदर्भासह मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’