Actress Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनॉन अभिनयाबरोबरच करणार ‘या’ क्षेत्रात काम

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री क्रिती सेनॉन (Actress Kriti Sanon) ही सध्या तिच्या वादग्रस्त आदिपुरुष चित्रपटामुळे (Adipurush Movie) लाइमलाइटमध्ये आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन हिच्या अभिनयावर या चित्रपटामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले असले तरी आता क्रिती एका नव्या क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन (Actress Kriti Sanon) अभिनयाबरोबरच आता आणखी एका क्षेत्रातही कार्यरत असणार आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉन हीने हिरोपंती (Heropanti) चित्रपटातून 2014 साली मनोरंजन विश्वात पदार्पण केले. मागील 10 वर्षांपासून ती आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडत आहे. या एका दशकामध्ये क्रितीने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. (Kriti Sanon Movie) आता याच एक दशकाच्या सिनेविश्वातील अनुभवाच्या जोरावर क्रिती आपली नवीन इनिंग सुरु करणार आहे. क्रिती आता थोडा करिअरचा ट्रॅक चेन्ज करत अभिनयाबरोबरच निर्मिती क्षेत्रात (Kriti Sanon As Producer) पाऊल ठेवत आहे. ही खुशखबर तिने आपल्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितली आहे. क्रितीने आपल्या प्रॉडक्शन हाऊसचा (Kriti Sanon Production House) एक टीझर शेअर केला आहे. यामध्ये तिने आपल्या संस्थेचे नाव ‘ब्लू बटरफ्लाय’ (Blue Butterfly) असे ठेवलेले असून आपली उत्सुकता सांगितली आहे. तिने या पोस्टला “…आणि आता गियर शिफ्ट करण्याची वेळ आली आहे.” असे लिहीले आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉनने या पोस्टला कॅप्शन लिहिले आहे की, या इंडस्ट्रीत मी नऊ वर्षांपासून माझे स्वप्न जगत आहे. मला चित्रपट निर्मितीचा प्रत्येक पैलू आवडतो. क्रितीने पुढे लिहिले. आता काहीतरी वेगळे करण्याची वेळ आली आहे माझ्या आणि तुमच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या आणखी कथा सांगण्याची वेळ आली आहे, आशा आहे की तुम्हाला ते खूप आवडतील. ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ ची सुरुवात करण्यासाठी खुप उत्सुक आहे.”असे तिने लिहिले आहे. क्रितीच्या या पोस्टवर सर्व लोक तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तिच्या या पोस्टवर वरुण धवन (Varun Dhawan), रितेश देखमुख (Ritesh Deshmukh), हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांसह अनेक कलाकारांनी व निर्मात्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री क्रिती सेनॉन (Actress Kriti Sanon) हिने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या लुक्का छुपी (Lukka Chupi), मीमी (Mimi), दिलवाले (Dilwale), हाऊसफुल (Housefull) या हिट चित्रपटातील भूमिका खूप गाजल्या आहेत. आता ती अभिनयाबरोबरच निर्मिती देखील करणार आहे. याआधी अनेक अभिनेत्रींनी अभिनयासोबत चित्रपटाची निर्माती म्हणून दुहेरी भूमिका बजावत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कंगना राणौत (Kangana Ranaut), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), आलिया भट्ट (Alia Bhatt) या अभिनेत्री असून यामध्ये आता क्रिती सेनॉनचे नाव देखील समाविष्ट झाले आहे.

Web Title :  Actress Kriti Sanon | kriti sanon launches own production house blue butterfly films adipurush actress shares teaser on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | ‘कोणता पक्ष? कोणता विचार? अन् कसली निष्ठा?’ रोहित पवारांचे खोचक ट्विट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले ‘ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली…’

Actress Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर पडली आहे प्रेमात; बॉलीवुडच्या ‘या’ व्यक्तीसोबत अफेअरच्या चर्चा

Pune Crime News | कमी किंमतीचे हिरे जास्त किंमतीला देवून 3 कोटी 48 लाखांची फसवणूक ! तनिष्क शोरूममधील सेल्समनला अटक; मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि शोरूमच्या मालकाविरूध्द गुन्हा

Chhagan Bhujbal | ‘साहेबांनी मला बोलवलं तर मीपण…’, छगन भुजबळांचं मोठं विधान

Pune Crime News | ‘आयुष’च्या प्रवेश परीक्षेच्या क्लासच्या नावाखाली महिलेशी अश्लिल वर्तन; शिक्षकावर गुन्हा दाखल

Monsoon Update | अनेक राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज