Actress Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर पडली आहे प्रेमात; बॉलीवुडच्या ‘या’ व्यक्तीसोबत अफेअरच्या चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Actress Shraddha Kapoor) हीने तिच्या अभिनयाच्या बळावर मनोरंजन विश्वात हक्काची जागा निर्माण केली आहे. अभिनेत्री श्रद्धाच्या निखळ हास्यावर व अभिनयावर अनेक लोक फिदा असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे. श्रद्धाचा ‘तू झुठी में मक्कार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता यामधील श्रद्धाच्या (Actress Shraddha Kapoor) अभिनयाचे कौतुक देखील झाले पण आता याच चित्रपटाच्या लेखकासोबत श्रद्धा रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुतूहल असते. श्रद्धा अनेकदा तिचे फॅमिलीसोबतचे क्युट फोटो शेअर करत असते. श्रद्धा आता तिच्या लव लाईफमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री श्रद्धा ही बॉलीवुडमधील चित्रपट लेखक राहूल मोदी (Film writer Rahul Mody) यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली. (Shraddha Kapoor Relationship) लेखक राहूल मोदी व श्रद्धा अनेकदा क्वालिटी टाईम स्पेंड करताना स्पॉट होतात. ते दोघे एकत्र ‘तू झुठी में मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यांचे मुव्ही डेटला गेलेले फोटो पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची (Shraddha Kapoor Affair) चर्चा रंगत आहे. श्रद्धा व रणबीर कपूरच्या या ‘तू झुठी में मक्कार’ चित्रपटाचे लेखकही राहूल मोदी आहे. मात्र दोघांनी अद्याप आपले नाते जाहीर केलेले नाही.

चित्रपट लेखक राहूल मोदी हा सोशल मीडियावर ॲक्टिव असून अनेकदा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. तो अनेकदा श्रद्धा कपूरच्या घरचे व कुत्र्यासोबत फोटो शेअर करत असतो. राहूल व श्रद्धा (Rahul and Shraddha Kapoor) अनेकदा एकत्र दिसत असल्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा आहेत. ते त्यांच्या नात्याची कधी कबुली देणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. (Shraddha Kapoor Boyfriend) या आधी अभिनेत्री श्रद्धा कपूर सेलिब्रेटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ (Celebrity Photographer Rohan Shrestha) सोबत 4 वर्षे सिरियस रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्यांचे 2022 सालीच ब्रेकअप झाले असून आता तिचे नाव राहूल मोदी सोबत जोडले जात आहे. सध्या अभिनेत्री श्रद्धा कपूर (Actress Shraddha Kapoor) अभिनेता राजकुमार राव (Actor Rajkummar Rao) सोबत ‘स्त्री 2’ (Stree 2 Movie) चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

Web Title :  Actress Shraddha Kapoor | shraddha kapoor is dating tu jhoothi main makkar writer rahul modi actress spotted with rumored boyfriend

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 5 July Rashifal : मेष, कर्क आणि मीन राशीसाठी दिवस यश देणारा, वाचा १२ राशींचे दैनिक राशीभविष्य

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Amol Mitkari | “शरद पवार आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही”; अमोल मिटकरींनी आव्हाडांना खडसावले

Monsoon Update | अनेक राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज