Monsoon Update | अनेक राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Monsoon Update | देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस (Monsoon Update) पडत आहे. उत्तर भारतातही सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. त्यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस म्हणजे दि. 8 जुलैपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD), कोकण (Konkan), गोवा (Goa) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) 5 आणि 6 जुलैला, गुजरातमध्ये (Gujarat) 7 जुलैला पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यामध्ये आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा (Monsoon Update) अंदाज वर्तवला आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल तसेच सिक्कीम, तामिळनाडू, पुडुचेरीत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशा राज्यात 6 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दिल्लीत मान्सून (Delhi Rain) सुरू झाल्यापासून सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्यानुसार (IMD), या आठवड्यातही दिल्लीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसानंतर काही भागात रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात ”ऑरेंज अलर्ट” –

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra Monsoon Update) काही जिल्ह्यांमध्ये आज (बुधवार) पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

Web Title :   Monsoon Update | weather update heavy rain is likely to in many states of the country till july 8

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 5 July Rashifal : मेष, कर्क आणि मीन राशीसाठी दिवस यश देणारा, वाचा १२ राशींचे दैनिक राशीभविष्य

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या