MLA Rohit Pawar | ‘कोणता पक्ष? कोणता विचार? अन् कसली निष्ठा?’ रोहित पवारांचे खोचक ट्विट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले ‘ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे नऊ आमदार सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा देऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. यात स्वत: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर एकीकडे अजित पवार गटाकडून 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाने (NCP Chief Sharad Pawar) देखील असाच दावा केला आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका होत आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी खोचक ट्विट केलं आहे. यावेळी रोहीत पवार (MLA Rohit Pawar) यांनी एक फोटो ट्विट केला आहे.

रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केलेल्या खोचक ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये महाराष्ट्राचा नकाशाच्या (Maharashtra Map) मध्ये शरद पवारांचा फोटो लावला असून त्यांच्याभोवती काही लोक उभे असल्याचे दिसत आहे. या नकाशाच्या बाहेर चार बाजूला कुत्रे भुंकत असल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

काय म्हणाले ट्विटमध्ये?

रोहित पवारांनी या ट्विटमध्ये एक कविता पोस्ट केली आहे. यामधून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे.

आज या दारात… उद्या त्या दारात…
पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल
मग लोकांना काय सांगणार?
तोंड कसं दाखवणार?
काल तर कडवा विरोध होता..
मग आज अचानक गळ्यात गळा कसा?
तो कोणता गळ आहे…
ज्या गळाला लागला मासा!
तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं?
रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं?
अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार?
किती दिवस आम्ही हेच ऐकायचं?
जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा..
आता कुणाकडून करायची जनतेने आशा?
भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा..
कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..
इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा..
कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत…
स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत.
कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा?
निर्लज्जपणाचा झाला कळस…
तुम्हाला येत नाही याची किळस?
मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची
ही कोणती रित?
ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली..
ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली?
शिव-शाहू-फुले-आंबेडकर…
तुम्ही महाराष्ट्र घडवला…
तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं..
पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन?
हे होत असेल तर रोखायचं कुणी?
विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी?
त्यासाठी साहेब….
लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती
आता तुम्हीच उठा…
अन मैदानात उतरा…
शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ..
त्यात माझेही असतील दोन हात..
अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.

Web Title : MLA Rohit Pawar | sharad pawar faction mla rohit pawar targets ajit dada group on ncp split

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 5 July Rashifal : मेष, कर्क आणि मीन राशीसाठी दिवस यश देणारा, वाचा १२ राशींचे दैनिक राशीभविष्य

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Amol Mitkari | “शरद पवार आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही”; अमोल मिटकरींनी आव्हाडांना खडसावले

Monsoon Update | अनेक राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज