Madhuri Dixit पासून Sridevi पर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी बाप-मुलगा दोघांसोबत पडद्यावर केला ‘रोमान्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये अनेक असे बाप-बेटे आहेत, जे पड्यावर एकत्र दिसले आहेत. त्यांच्या जोड्या लोकांनी खुप पसंत केल्या, परंतु आम्ही आपल्याला अशा बाप-लेकाच्या जोड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी एकाच अ‍ॅक्ट्रेससोबत पडद्यावर रोमान्स केला आहे. असे अनेकदा झाले आहे, परंतु याकडे लोकांचे लक्ष जात नाही. आम्ही अशा स्टर्सची यादीच सांगणार आहोत.

अमृता सिंहसोबत धर्मेंद्र आणि सनी देओल
अमृता सिंहने बॉलीवुडमध्ये सनी देओलसोबत बेताब चित्रपटातून सुरूवात केली. सहा वर्षानंतर तिने ’सच्चाई की तख्त’ मध्ये धर्मेंद्रच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका केली.

डिंपल कपाडियासोबत धर्मेंद्र आणि सनी देओल
डिंपल कापडीयाने सनी देओलसोबत ’मंजिल मंजिल’ मध्ये केले. तर धर्मेंद्रसोबत ’मस्त कलंदर’ आणि ’दुश्मन देवता’ चित्रपटात काम केले.

डिंपल कपाडियासोबत विनोद खन्ना आणि अक्षय खन्ना
डिंपल कापडीया ’दिल चाहता है’मध्ये अक्षय खन्नासोबत दिसली होती. तसेच अक्षयचे वडील विनोद खन्ना यांच्यासोबत ’बंटवारा’, ’लेकिन’, ’इंसाफ’ आणि ’दबंग’मध्ये काम केले.

हेमा मालिनीसोबत राज कपूर आणि रणधीर कपूर
हेमा मालिनीला तिचा चित्रपट ’सपनों का सौदागर’मध्ये राज कपूरच्या अपोझिट कास्ट केले होते. तर ’हाथ की सफाई’मध्ये रणधीर कपूरसोबत हेमा मालिनी दिसली होती.

माधुरी दिक्षितसोबत विनोद खन्ना आणि अक्षय खन्ना
माधुरी दिक्षितने विनोद खन्नासोबत ’दयावान’ चित्रपट केला होता, ज्यामध्ये तिने विनोद खन्नाला ऑनस्क्रीन किस केले होते. तर माधुरी ’मोहब्बत’मध्ये अक्षय खन्नासोबत रोमान्स करताना दिसली होती.

श्रीदेवीसोबत धर्मेंद्र आणि सनी देओल
श्रीदेवीने धर्मेंद्रसोबत अनेक चित्रपट केले. दोघे ’वतन के रखवाले’, ’फरिश्ते’, ’नाका बंदी’ आणि ’सल्तनत’मध्ये एकत्र दिसले होते. तर ’निगाहें: नगीना पार्ट 2’, ’चलबाज’, ’राम-अवतार’मध्ये सनी देओल सोबत काम केले.

श्रीदेवीसोबत नागेशवर राव आणि नागार्जुन
श्रीदेवीने ’मुद्दुला मोगुडु’ चित्रपटात अक्किनेनी नागेश्वर राव यांच्यासोबत काम केले. ’गोविंदा’, ’खुदा गवाह’, ’मेरा बेचार’ आणि ’आखिरी पोरोटमा’मध्ये ती नागार्जुन सोबत रोमान्स करताना दिसली.