Pankaja Munde | पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक, काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम; म्हणाल्या – ‘जे काही करायचं ते डंके की चोट पर करेन’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) सध्या चर्चेत आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून त्या वेगवेगळ्या पार्टीत जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे देखील भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अशा स्थितीत राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी होणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, पंकजा मुंडे (Pankaja Munde) या काँग्रेसमध्ये (Congress) जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, या चर्चेवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) पराभव झाल्यानंतर अनेक निर्णय झाले. मला उमेदवारी न मिळाल्याने मी नाराज असल्याचे म्हटलं गेलं. अनेक कार्यक्रमांमध्ये मी स्पष्टपणे भूमिका मांडल्या आहेत. परत परत भूमिका मांडण्याचं माझ्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. गेले काही दिवस अनेक पक्षाच्या कर्यकर्त्यांनी पंकजा मुंडे आमच्याकडे आल्या तर चांगलं असे भष्य केलं होतं.

मी नाराज नाही पण दुखी आहे

यासंदर्भात मी फारसं भाष्य केले नाही. परवा आलेल्या बातमीमध्ये सांगितलं की राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आणि मी काँग्रेसच्या वाटेवर आहे. मी ईश्वर साक्ष कथन करते, मी कोणत्याही पक्षाच्या, नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी कधीही भेटले नाही. मी राहुल गांधींना कधी भेटले नाही. माझे जे काही जगासमोर आहे. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाला खूप महत्व आहे. मी नाराज नाही पण दुखी आहे. माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे मी न्यायालयात लढाई लढणार आहे असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.

दोन महिन्यांचा ब्रेक घेणार

हे सर्व दावे खोटे असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितलं. आपण पक्ष सोडत नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. ‘मला जे काही करायचंय ते डंके की चोट पर करेन, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चा तुर्तास थांबल्या असल्या, तरी या स्पष्टीकरणासोबतच पंकजा मुंडेंनी आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याची मोठी घोषणा यावेळी केली.

मी भाजपाच्या संस्कारांमध्ये वाढले

मी रोज बातम्या बघते की बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) शिवसेना (Shiv Sena) राहिली नाही. शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी (NCP) राहिली नाही. मला वाटतं की उद्या लोकांनी पंडित दीनदयाल उपाध्याय (Pandit Deendayal Upadhyay) व अटलजींची (Atal Bihari Vajpayee) भाजपा राहिली नाही असा विचार करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचं आपलं काम आहे. मी त्या भाजपाच्या संस्कारांमध्ये वाढले आहे. असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी प्रचंड संभ्रमात

या सगळ्या भूमिकांशी प्रतारणा करणाऱ्या भूमिका माझ्या आजूबाजूला असल्यामुळे मी प्रचंड संभ्रमात आहे. मी गेल्या 20 वर्षांत सुट्टी घेतलेली नाही. मला एक-दोन महिने सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी नमूद केलं.

Web Title :  Pankaja Munde | bjp leader pankaja munde announced 2 months break from politics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Constable Suicide News | पुण्यात पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत केली आगळी वेगळी मागणी

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या आजचे दर

Maharashtra State Election Commission | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही