अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

मुंबई  न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) यांचे पती आणि निर्माता, दिग्दर्शक राज कौशल (वय ४९) Raj Kaushal यांचे आज ह्दयविकाराच्या (Heart Attack) धक्क्याने निधन झाले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि राज कौशल Raj Kaushal यांचा विवाह फेब्रुवारी १९९९ रोजी झाला होता. १९जून २०११ रोजी मंदिराच्या वीर या मुलाचा जन्म झाला होता. मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि राज कौशल Raj Kaushal यांनी ४ वर्षांच्या ‘तारा’ या मुलीला दत्तक घेतले आहे.

राज कौशल Raj Kaushal हे दिग्दर्शक, निर्माता होते. त्यांनी आपले करियर अभिनेता म्हणून सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अंथनी कौन है, शादी का लड्डु, प्यार में कभी कभी असे काही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. त्यानंतर माई ब्रदर… निखिल, शादी का लड्डु, प्यार मे कभी कभी या चित्रपटांचे ते निर्माताही होते.

दिग्दर्शक ओनिर यांनी राज कौशल यांच्या निधनाचे वृत्त ट्विट करुन दिले. राज कौशल यांना आपण आज सकाळी गमावले आहे. माझी पहिली फिल्म माई ब्रदर निखिल चे ते निर्माता होते. ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्या सर्वांमध्ये राज एक होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : actress mandira bedi husband director raj kaushal dies of heart attack

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर