अभिनेत्री नीना गुप्तानं ‘अशा’ अवतारात शेअर केले सोशलवर फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री नीना गुप्ता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अ‍ॅक्टीव आहे. अलीकडेच आलेला तिचा सिनेमा बधाई हो प्रेक्षकांना खूपच आवडला होता. यात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होताना दिसले. सध्या नीनाचा एक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. काहीसे वेगळेच असे हे फोटो आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. नीनाचे हे फोटो सेटवरील कामाला सुरुवात करण्यापर्वीचे आहेत.

फोटोत दिसत आहे नीना खुर्चीवर बसली आहे. तिच्या पूर्ण डोक्यावर आणि खांद्यावर हिरव्या रंगाचं लिक्विड लावलं आहे. या फोटोत ती ममी सारखीच दिसत आहे. हे ग्रीन लिक्विड कपड्यांच्या पट्ट्यांनी झाकलं आहे. अनेकांनी नीनाच्या डेडिकेशनचं कौतुक केलं आहे.

हा फोटो शेअर करताना आपल्या कॅप्शनमध्ये नीना म्हणते, “एक अ‍ॅक्ट्रेस तयार होत आहे.” बधाई हो सिनेमातील तिचा कोस्टार गजराज राव म्हणतो, “नीनाजी कामाप्रति तुमचं समर्पण प्रेरणादायी आहे. चीयर्स!” नीनाचे हे फोटो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

 

Visit : Policenama.com