Actress Pooja Batra | मिस इंडिया किताब मिळवणाऱ्या टॉपच्या अभिनेत्रीने लग्नासाठी यशाच्या शिखरावर असताना सोडले करिअर; ‘आता वयाच्या 40मध्ये…’

पोलीसनामा ऑनलाइन – Actress Pooja Batra | अनेक लोकांना बॉलीवुडमध्ये येण्याची इच्छा असते. मात्र खूप कमी लोकांना या सिनेविश्वात प्रसिद्धी मिळते आणि काम मिळते. मात्र त्याही पेक्षा फार कमी लोक लग्नासाठी ही दुनिया पूर्णपणे सोडून नवीन आयुष्य सुरु करतात. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री पूजा बत्रा. (Actress Pooja Batra) एकेकाळची प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्राने लग्नामुळे अचानक इंडस्ट्री सोडली.

अभिनेत्री पुजा बत्रा ही 90 च्या दशकातील यशाच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. पुजा अगदी लहान वयापासून प्रकाशझोतात होती. तिने कमी वयात या ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवलं. 1993 मध्ये एका साबणाच्या जाहिरातीत ती दिसली आणि या जाहिरातीतून तिची पॉप्युलॅरिटी वाढत गेली. या जाहिरातीमधून तिची ‘लिरिल गर्ल’ (Lyril Girl) अशी ओळख निर्माण झाली. तसेच त्याचवर्षी म्हणजे 1993 सालीच अभिनेत्री पुजा बत्रा हिला मिस इंडिया आशिया पॅसिफिक (Miss India Asia Pacific) किताबही मिळाला.

पुजा बत्राचा जन्म 27 ऑक्टोबर 1975 मध्ये पंजाबच्या लुधियानामध्ये (Ludhiana, Punjab) झाला. पुजाला या क्षेत्राचे बाळकडू घरातूनच मिळालेले असून पूजाची आई नीलम या 1971 मध्ये मिस इंडिया (Miss India) स्पर्धक होत्या. तिच्या आईमुळे पूजाला मॉडेलिंग (Modeling) आणि अभिनय क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि ती करिअर म्हणून या क्षेत्राकडे वळाली. पूजाला केवळ वयाच्या 18व्या वर्षी 1993 मध्ये मिस आशिया पॅसिफिकमध्ये तिसरी रनर-अप म्हणून किताब मिळाला. त्याचवर्षी ती मिस इंडिया(Miss India 1993) देखील बनली. पूजाची घौडदौड सुरुच होती. लहान वयात तिने मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूजाने पहिला सिनेमा विरासतमधून (Virasat) बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तिने हसीना मान जाएगी (Haseena Maan Jayegi), कही प्यार ना हो जाए (Kahin Pyaar Na Ho Jaaye) अशा 20 हून अधिक सिनेमात तिने अभिनय करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. महत्त्वपूर्ण अशा भूमिका पूजाने साकारल्या आहेत. यावेळी ती करिअरच्या एकदम टॉपवर होती. मात्र अशा वेळी तिने महत्त्वाचा निर्णय घेतला.

90च्या दशकात यशाच्या शिखरावर असताना पुजाने लग्नाचा निर्णय घेतला.
तिने एका डॉक्टरसोबत लग्न करण्यासाठी आपले फिल्म इडस्ट्रीचे करिअर पूर्णपणे सोडून दिले.
2002 मध्ये पूजाने बॉलिवूड (Bollywood) करिअर सोडून डॉक्टर सोनू एस अहलूवालियासह (Sonu S Ahluwalia) लग्नगाठ बांधली. आणि ती भारताबाहेर कॅलिफोर्नियात (California) शिफ्ट झाली.
लॉस एंजेलिस कॅलिफोर्नियामध्ये ती राहत होती. मात्र तिचे हे लग्न काही टिकले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार 9 वर्षानंतर 2011 मध्ये पूजा आणि सोनू अहलूवालिया यांनी घटस्पोट घेतला.
दोघांमध्ये बाळावरुन वाद झाल्याचं बोललं जातं. पूजाला बाळ नको होतं, तर तिच्या पतीला बाळ हवं होतं.
त्यावरुन दोघांमधील या मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाल्याचं बोललं जातं.

मात्र अभिनेत्री पुजा बत्रा (Actress Pooja Batra) हि वयाच्या ४०व्या वर्षी पुन्हा एकदा प्रेमात पडली.
तिला वयाच्या 40 नंतर प्रेम मिळालं. 4 जुलै 2019 रोजी पुजाने अभिनेता नवाब शाह (Actor Nawab Shah)
सोबत दिल्लीमध्ये लग्न केलं. मात्र पुजाच्या या दुसऱ्या लग्नाची खबर तिने कोणाला लागू दिली नाही.
त्यांनी गुपचूप हा लग्न सोहळा उरकला.

Web Title :  Actress Pooja Batra | pooja batra who was miss india her first marriage broke up with doctor after 9 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shasan Aplya Dari | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना व सेवांच्या लाभाचे वाटप

Mahatma Basaveshwar Statue Nigdi Pune | पुणे : निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण

CM Eknath Shinde | ‘असा मुख्यमंत्री कधी पाहिलाय का? जे बोलतो ते…’ – एकनाथ शिंदे (व्हिडिओ)