Actress Priya Bapat | “मेकअप का केलास? चेहरा धुवून टाक…” प्रिया बापटने सांगितल्या मुन्नाभाई MBBS शुटिंगचे किस्से

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या अभिनयाने हिंदी व मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वत: ची ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Actress Priya Bapat) ही कायम चर्चेत असते. सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ (City Of Dreams) या वेबसिरीजमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. याच वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्थ असून नुकतीच तिने कर्ली टेल्स’च्या (Curly Tales) ‘तेरे गली मैं’ (Tere Gali Main) या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली. या दरम्यान मुलाखतीमध्ये प्रियाने (Actress Priya Bapat) तिचे लहानपणीचे व मनोरंजन विश्वात काम करायला सुरुवात करताना आलेले अनुभव शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्रिया बापट ही अगदी बालकलाकार म्हणून काम करत असली तरी तिची ‘मुन्नाभाई MBBS’ या चित्रपटातील छोटीशी भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. यामध्ये लहानशा प्रियाने योग्यरितीने भूमिका निभावली पण यामध्ये दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे प्रियाने कबुल केले.

प्रियाला शोमध्ये एवढ्या लहान वयात ‘मुन्नाभाई MBBS’ (Munnabhai MBBS) सारख्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर उत्तर देत प्रिया म्हणाली, “मुन्नाभाई चित्रपटाच्या वेळी मी लहान होते तेव्हा मी बालकलाकार म्हणून काम करायचे, त्यामुळे शूटिंगसाठी पोहोचल्यावर कोणाला कोणत्या नावाने हाक मारू काहीच कळत नव्हते. तेव्हा राजू सरांना मी तुम्हाला अंकल बोलू का? असे विचारले होते. त्यावर त्यांनी अजिबात नको, तू मला राजू बोल असे सांगितलं होतं.”

‘मुन्नाभाई MBBS’ चित्रपटाच्या आणखी काही आठवणी शेअर करत प्रियाने करिअरच्या सुरुवातीचे किस्से सांगितले.
प्रियाला राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव
कसा होता? याबद्दल प्रश्न करण्यात आला. यावर अभिनेत्री प्रियाने एक किस्सा सर्वांसोबत शेअर केला. ती म्हणाली की, “राजू सर खूप चांगले आहेत. एक दिग्दर्शक कलाकाराला घडवत असतो यावर माझा विश्वास आहे. माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप पाहून त्यांनी पहिल्याच दिवशी हा ‘मेकअप का केलास? चेहरा धुवून टाक’ असे सांगितले होते. जशी आहे तशीच छान वाटतेस, असे सांगून राजू सरांनी मला डायलॉग कसे बोलावेत याविषयी मार्गदर्शन केले होते. ‘मुन्नाभाई MBBS’ चित्रपटातील एकाही सीनमध्ये मी मेकअप केला नव्हता, ते दिवसच फार सुंदर होते.”

अशा शब्दात प्रिया बापटने (Actress Priya Bapat) आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना
उजाळा दिला. प्रिया सध्या तिच्या सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजसाठी काम करत आहे. प्रियाने अनेक मराठी चित्रपट,
हिंदी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये तिची टाईमपास 2 (Timepass 2),
काकस्पर्श (Kaksparsha), वजनदार (Vajandar) ,टाईम प्लीज (Time Please) मधील भूमिका गाजल्या आहेत.
अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) यांच्या जोडीलाही प्रेक्षकांची
विशेष पसंती मिळत आहे.

Web Title :  Actress Priya Bapat | priya bapat talks about her experience of working in the movie munnabhai mbbs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | युती टिकवण्यासाठी भाजप-शिंदे गटाचा मोठा निर्णय, शंभूराज देसाईंनी दिली माहिती

Maharashtra Policemen Death During Swimming | पार्टीनंतर स्विमींगसाठी गेलेल्या पोलिसाचा बुडून मृत्यू

Congress Mohan Joshi On Prakash Javadekar | पुण्याबद्दल आकस नसेल तर माजी मंत्री प्रकाश जावडेकरांनी पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी