Maharashtra Politics News | युती टिकवण्यासाठी भाजप-शिंदे गटाचा मोठा निर्णय, शंभूराज देसाईंनी दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिवसेनेकडून (Shivsena) वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ अशा माथळ्याखाली शिवसेनेच्या शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Group) मंगळवारी एक जाहिरात प्रसिद्ध (Shivsena Advertisement) केली होती. या जाहिरातीमुळे राजकारणात मोठा वादंग निर्माण झाले आहे.(Maharashtra Politics News) या जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्त्यांची मनं दुखावली आहेत, याचा खुलासा भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठी माहिती दिली आहे.

जाहिरातीवरुन भाजप-शिंदे गटात नाराजी नाट्य रंगल्यानंतर शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत याबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. विषय संपवू आणि 2024 च्या कामाला लागू. सामंज्यासाच्या भूमिकेतून पुढे जाऊ. (Maharashtra Politics News) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) लवकरच समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते या समितीत असतील. जेव्हा समिती गठीत होईल, तेव्हा या सगळ्या बाबी समितीपुढे येतील असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

शंभूराज देसाई पुढे म्हणाले, नवी जाहिरात ही शिवसेना पक्षाची अधिकृत जाहिरात आहे.
भाजप आणि शिवसेना तसेच मित्र पक्षात काही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
ते दूर व्हावे, यासाठी नवीन जाहिरात दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या नेतृत्वाखाली ही युती भक्कम आहे. या महायुतीमध्ये कोणताही बेबनाव होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आम्ही काळजी घेतो, भाजपनेही घ्यावी

जाहिरातीवरुन भाजप नेते नाराज झाले आहेत. शिवसेना शिंदे गटावर टीका करताना दिसत आहेत.
बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही. शिंदेंचा सर्व्हे ठाण्यापुरता मर्यादित होता का? एकनाथ शिंदे यांना
ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटतो, अशी खोचक टीका भाजप खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी केली.
यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, बेताल वक्तव्य कुणी करत असेल तर बरोबर नाही.
आम्ही बोलताना काळजी घेतो, भाजपनेही घ्यावी. अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळावीत, असं देसाई म्हणाले.

Web Title :  Maharashtra Politics News | after advertisement row bjp and shivsena shinde group take big decision to survive alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Three Policemen Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या प्रकरण

India Weather Update | कुठे उन्हाच्या झळा, तर कुठे पावसाचा इशारा; काय सांगतोय ‘IMD’चा अंदाज?