Maharashtra Policemen Death During Swimming | पार्टीनंतर स्विमींगसाठी गेलेल्या पोलिसाचा बुडून मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Policemen Death During Swimming | पार्टी केल्यानंतर पोहण्यासाठी गेलेल्या पोलिसाचा शेततळयात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्यात दम लागल्यामुळे ते बुडाले असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, या घटनेनंतर सांगली पोलिस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (Maharashtra Policemen Death During Swimming)

सांगली पोलिस (Sangli Police News) मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तिम्बती आवळे यांचा मृत्यू झाला आहे (ASI Death Sangli). यामुळे सांगली पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

मंगळवारी भोसे येथे सांगलीच्या होमगार्ड चालकांची परिक्षा होती. त्यासाठी एएसआय तिम्बती आवळे आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांची तेथे नियुक्ती करण्यात आली होती. परिक्षा झाल्यानंतर तिम्बती आवळे आणि त्यांचे सहकारी विनायक कांबळे हे घरी पार्टीसाठी गेले होते. पार्टीनंतर दोघे शेततळयात स्विमींगसाठी गेले. पोहताना तिम्बती आवळे यांचा बुडून मृत्यू झाला आहे. दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Sangli Crime News)

Web Title : Maharashtra Policemen Death During Swimming | A policeman who went swimming after a party drowned

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Three Policemen Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या प्रकरण

India Weather Update | कुठे उन्हाच्या झळा, तर कुठे पावसाचा इशारा; काय सांगतोय ‘IMD’चा अंदाज?