Actress Priyamani | अभिनेत्री प्रियामणीने सांगितले चित्रपटात किसिंग सीन न देण्यामागचे खरे कारण

पोलीसनामा ऑनलाइन – ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री प्रियामणी (Actress Priyamani) ही अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्गही मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. मात्र चित्रपटांची निवड करण्याबबात तिचे काही नियम आहेत असे तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ती (Actress Priyamani) नो किसिंग पॉलिसी फॉलो करते असे तिने जाहीर केले आहे.

अभिनेत्री प्रियामणी ही कोणत्याही सिनेमामध्ये बोल्ड सीन (Bold Scene) व किसिंग सीन (Kissing Scene) देत नाही. ती ‘नो किसिंग पॉलिसी’ (No Kissing Policy) फॉलो करत असल्याचे तिने सांगितले. असे करण्यामागचे कारणही तिने स्पष्ट केले आहे. अभिनेत्री प्रियामणीने दिलेल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपट स्वीकारण्याचे तिचे काही नियम असून ती किसिंग सीन, इंटिमेट सीन देत नाही असे सांगितले आहे. अभिनेत्री प्रियामणी म्हणाली की, “ऑनस्क्रीन किस आणि बोल्ड सीन न करणं ही माझी पर्सनल चॉइस आहे. मी ऑनस्क्रीन किस करण्यासाठी नकार देते. फक्त गालावर किस करण्यास होकार देत. ही एक भूमिका असते हे मला ठाऊक आहे. परंतु वैयक्तिरित्या सांगायचं झालं तर, मला जर ऑनस्क्रीन कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला किस करायला लागली तर मला अवघडल्यासारखं वाटतं. शिवाय यामागचं कारण माझ्या नवऱ्याला द्यावं लागतं.”

एका चित्रपटातील किस्सा शेअर करत ती म्हणाली की, ‘हिज स्टोरी’ (His Story) मध्ये मला अभिनेता सत्यदीप मिश्राबरोबर (Actor Satyadeep Mishra) बोल्ड सीन करायचा होता. त्यावेळीही मला अवघडल्यासारखं झालं. मी म्हटलं, मी गालावर एक किस करेन. यापेक्षा अधिक गोष्टी करताना मला अवघडल्यासारखं होत. माझ्याकडे बरेच प्रोजेक्ट आले, ज्यामध्ये बोल्ड सीन होते. पण मी त्याला नकार दिला” असे तिने स्पष्ट केले. तसेच ती म्हणाली की, “जेव्हा माझा एखादा किस आणि बोल्ड सीन केलेला प्रोजेक्ट रिलीज होईल, तेव्हा तो प्रोजेक्ट माझं दोन्ही कुटुंब पाहतं. आणि असं पाहून ते लोकं विचार करतील की, लग्न होऊनही आमची सून असं का करत आहे? इतर व्यक्ती तिच्यावर हात का टाकत आहे? जरी ते लोकं असं माझ्यासमोर बोलले नाही, तरीही ही माझी पर्सनल चॉइस आहे. माझं हे काम आहे, हे त्यांना माहित आहे. पण मला अवघडल्यासारखं होऊ नये, असं माझं ठाम मत आहे.”

मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्री हा नो किसिंग पॉलिसी फॉलो करतात. चित्रपटादरम्यान असणारे किसिंग सीन आणि इंटिमेट सीन करण्यास स्पष्ट नकार देतात. या आधी प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Actress Tamanna Bhatia) ही देखील 18 वर्षे ही पॉलिसी फॉलो करत होती. मात्र बॉयफ्रेंड विजय वर्मा सोबत लस्ट स्टोरीज् ओटीटी चित्रपटात तिने इंटिमेट सीन दिले आहेत. अभिनेत्री प्रियामणी (Actress Priyamani) हिने ती किसिंग सीन न देण्यामागचे कारण सांगितले आहे.

Web Title : Actress Priyamani | actress priyamani talks about why she not doing kissing and bold scene onscreen

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Kajal Aggarwal | दाक्षिणात्य अभिनेत्री काजलने शेअर केली रकुल प्रित सिंग, समंथा आणि तमन्नासाठी खास स्टोरी

Buldhana Bus Accident | ‘…ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे’, संजय राऊतांच्या टीकेला राणा दाम्पत्याचे प्रत्युत्तर

Top Monsoon Getaways near Pune: Explore Nature’s Beauty and Adventure

CM Eknath Shinde | ‘वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात आवश्यक ते सर्व केले जाईल’, बुलढाणा अपघातस्थळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Uddhav Thackeray on Buldhana Accident | या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा दुर्घटनेवरुन उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Disha Patani | अवॉर्ड नाईटमधील रिव्हिलिंग ड्रेसने दिशा पाटनीवर खिळल्या नजरा; चाहत्यांनी केल्या कमेंटस्