Actress Radhika Madan | ‘या निर्णयामुळे माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे…’ अभिनेत्री राधिका मदन हिने शेअर केला तिचा फिटनेस फंडा

पोलीसनामा ऑनलाइन – उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मनोरंजनविश्वात स्थान मिळवणारी अभिनेत्री राधिका मदन (Actress Radhika Madan) ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची अंग्रेजी मीडियम (Angrezi Medium) चित्रपटातील इरफान खानच्या (Irrfan Khan) मुलीची भूमिका अतिशय गाजली. तेव्हापासून तिच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली. नुकताच तिचा ‘सास, बहू और फ्लेमिंगो चित्रपट (Saas, Bahu Aur Flamingo) प्रदर्शित झाला असून सध्या राधिका या चित्रपटाचे यश सेलिब्रेट करत आहे. याचबरोबर तिने ओटीटी प्लॅटपफॉर्मवरही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. राधिकाचा ‘कच्चे लिंबू’ (Kacchey Limbu) सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

अभिनेत्री राधिका मदन (Actress Radhika Madan) सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेक लोक तिच्या चित्रपटातील अभिनयाबरोबरच तिच्या फिटनेसचेही चाहते आहेत. राधिकाने तिच्या फिटनेससाठी आहारमध्ये केलेला बदल सर्वांसोबत शेअर केला आहे.

एका मुलाखती दरम्यान राधिकाने तिचा फिटनेस फंडा शेअर केला आहे. राधिकाने सांगितले, ‘मी नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद केलं आहे. आधी मी नॉन व्हेज प्रेमी होते आणि खूप नॉनव्हेज (Non-Veg Food) खायचे. पण मी आता पूर्णपणे मासांहार सोडून दिले आहे. म्हणजेच फक्त नॉनव्हेज नाही तर मी दूध आणि दूधाचे पदार्थ खाणेही व्हेगन (Vegan Food) सोडले आहे. प्राण्यांपासून मिळणाऱ्या कोणत्याच अन्नाच मी सेवन करत नाही. आता मी फक्त वनस्पतीपासून तयार होणारे अन्न खाते.’

ही गोष्ट शेअर करत ती पुढे म्हणाली, ‘या निर्णयामुळे माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे.
यामुळे माझ्या मानसिक आणि शारीरिक स्वस्थ्यावर मोठा प्रभाव पडला आहे.
मला आता आधीपेक्षा जास्त आरोग्यदायी वाटतंय. मांस आणि दूध खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त व्हेगन अन्न
खाणाऱ्या लोकांचं आयुष्यमान अधिक असतं. माझ्यासाठी व्हेगन होण जास्त अवघड नव्हतं.
कारण मी लहानपणापासूनच पालेभाज्या, वरण भात, छोले हे खात होते. प्रोटीन साठी मी सातूच्या पीठाचे पदार्थ खाते.
आता डाएटिशियन देखील व्हेगन अन्न खाण्याचे आवाहन करतात.
हे अन्न प्रत्येकाला अनेक आजारापासून दूर ठेवत असते.’
असे मत अभिनेत्री राधिका मदन (Actress Radhika Madan) हिने शेअर केले आहे.

Web Title : Actress Radhika Madan | actress radhika madan became vegan shared her experience how her fitness has been improved

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | युती टिकवण्यासाठी भाजप-शिंदे गटाचा मोठा निर्णय, शंभूराज देसाईंनी दिली माहिती

Maharashtra Policemen Death During Swimming | पार्टीनंतर स्विमींगसाठी गेलेल्या पोलिसाचा बुडून मृत्यू

Congress Mohan Joshi On Prakash Javadekar | पुण्याबद्दल आकस नसेल तर माजी मंत्री प्रकाश जावडेकरांनी पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी