मनोरंजन

अभिनेत्री रेखा नाही देत बंगल्याच्या सॅनिटायजेशनला परवानगी ? लवकरच करणार ‘कोरोना’ टेस्ट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूड स्टार रेखाच्या बॉडीगार्डला कोरोना झाल्यानंतर रेखा सतत चर्चेत येताना दिसत आहे. रेखाचा बंगाल सील केला असून बाहेर कंटेंटमेंट झोनचा बोर्डही लावण्यात आला आहे. असंही बोललं जात आहे की, रेखाला कोरोना झाला आहे. परंतु अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. याशिवाय रेखा कोरोना टेस्ट करण्यासाठी तयार नाही असंही बोललं जात होतं. असं असतानाच आता अशी माहिती समोर येत आहे की रेखा कोरोना टेस्टसाठी तयार आहे.

https://www.instagram.com/p/CCs7z3FBdco/

समोर आलेल्या माहितीनुसार, रेखाच्या मॅनेजरनं बीएमसीला फोन केला आणि सांगितलं की, पुढील दोन ते तीन दिवसात रेखा आणि फरजाना कोरोनाची टेस्ट करणार आहेत. त्यांच्या टेस्ट होताच त्यांचे रिपोर्ट लगेच बीएमसीला पाठवले जातील.

https://www.instagram.com/p/CCqk8N7Bhm4/

जेव्हा रेखाच्या बॉडीगार्डला कोरोनाची लागण झाली होती त्यानंतरच बीएमसीचे कर्मचारी रेखाच्या घरी गेले होते. रेखाचं घर सॅनिटाईज करण्यासाठी ते सातत्याने 7 दिवस घराचा दरवाजा ठोठावत होते. परंतु कोणीच गेट खोललं नाही. त्यांना आत येऊ दिलं नाही. परंतु आता असंही सांगितलं जातं आहे की, घराचं सॅनिटायजेशन झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे रेखा कोरोना टेस्टला नकार देत असल्याचंही बोललं जातं होतं.

https://www.instagram.com/p/CCIjV39hDsZ/

https://www.instagram.com/p/CBDAhUVgb2t/

https://www.instagram.com/p/CAajzqtBqoc/

https://www.instagram.com/p/B9qQ8yNhmyi/

 

Back to top button